‘बिग बाॅस 17’मध्ये होणार तारक मेहता मालिकेतील ‘या अभिनेत्याची एन्ट्री, मालिकेच्या निर्मात्याला मोठा झटका, थेट
बिग बाॅस 17 हे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. चाहते हे बिग बाॅस 17 ची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. बिग बाॅस 17 बद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. बिग बाॅस 17 ला सलमान खान हाच होस्ट करताना दिसणार आहे. लवकरच हे सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
मुंबई : नुकताच बिग बाॅस ओटीटी 2 (Bigg Boss Ott 2)चा फिनाले पार पडलाय. विशेष म्हणजे बिग बाॅस ओटीटी 2 ला होस्ट करताना देखील सलमान खान दिसला. बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादव झालाय. एल्विश यादव याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळाली. बिग बाॅस ओटीटी 2 ने मोठा धमाका हा नक्कीच केलाय. बिग बाॅस ओटीटी 2 नंतर आता चाहत्यांना वेद लागले ते म्हणजे बिग बाॅस सीजन 17 चे. चाहते हे गेल्या कित्येक दिवसांपासून बिग बाॅस सीजन 17 ची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. हे सीजन धमाका करणार असल्याचे सांगितले जातंय.
विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच बिग बाॅस सीजन 17 मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धेकांची एक यादी व्हायरल होताना दिसली. यामध्ये चक्क पाकिस्तानमधून भारतामध्ये आलेल्या सीमा हैदर हिचे देखील नाव होते. सीमा हैदर हिने देखील काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले की, आपल्याला बिग बाॅस सीजन 17 ची आॅफर आलीये. सीमा हैदर बिग बाॅस सीजन 17 मध्ये सहभागी होणार की नाही हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
बिग बाॅस सीजन 17 मध्ये सहभागी होण्यासाठी अजून एक नाव जोरदार चर्चेत आहे. ते नाव दुसरे तिसरे कोणीही नसून अनेक वर्षे तारक मेहता मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारे अभिनेते अर्थात शैलेश लोढाचे आहे. होय, बिग बाॅस सीजन 17 मध्ये शैलेश लोढा देखील सहभागी होणार असल्याची तूफान चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. आता त्यावर मोठे अपडेट आलंय.
View this post on Instagram
आता हे फायनल आहे की, बिग बाॅस सीजन 17 मध्ये शैलेश लोढा सहभागी होणार. काही दिवसांपूर्वीच शैलेश लोढाने तारक मेहता मालिकेचे निर्माता असित कुमार मोदीवर अत्यंत गंभीर आरोप केले. यामुळेच आता बिग बाॅस सीजन 17 मध्ये शैलेश लोढा काय खुलासे करतात, याकडे सर्वांचाच नजरा आहे. असित कुमार मोदी आणि शैलेश लोढा यांच्यामधील वाद थेट कोर्टात पोहचला.
बिग बाॅस सीजन 17 तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील असून काही माजी कलाकार सहभागी होण्याची चर्चा आहे. सध्या तरी हे स्पष्ट झाले आहे की, शैलेश लोढा बिग बाॅस सीजन 17 मध्ये धमाका करणार आहे. गेल्या तब्बल 15 वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. मात्र, काही दिवसांपासून ही मालिका मोठ्या वादात सापडलीये.