पार्टी अंबानींची चर्चा होतंय महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाची, अभिनेत्रीसोबतचा ‘तो’ व्हिडीओ..

अंबानींच्या पार्टीतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. हेच नाही तर या पार्टीला अनेक बाॅलिवूड कलाकार दाखल झाले. फक्त देशच नाही तर विदेशातूनही पाहुणे या पार्टीत पोहचले.

पार्टी अंबानींची चर्चा होतंय महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाची, अभिनेत्रीसोबतचा 'तो' व्हिडीओ..
Follow us
| Updated on: Mar 04, 2024 | 12:10 PM

मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन सध्या गुजरातमधील जामनगरमध्ये सुरू आहे. फक्त देशच नाही तर विदेशातूनही पाहुणे या प्री वेडिंग फंक्शनसाठी पोहचले. बाॅलिवूडचे अनेक कलाकार देखील या फंक्शनसाठी आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत जामनगरमध्ये दाखल झाले. आता या प्री वेडिंग फंक्शनमधील विविध फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. बाॅलिवूड स्टार या फंक्शनमध्ये धमाल करताना दिसले. पाहुण्यांसाठी खास जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली. तब्बल 2500 पदार्थ जेवणात वाढले गेले.

याच प्री वेडिंग फंक्शनमधील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलाय. या व्हिडीओमध्ये असे काही घडले की, हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कतरिना कैफ आणि विकी काैशल यांना भेटताना जान्हवी कपूर ही दिसत आहे.

विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये कतरिना कैफ, विकी काैशल, जान्हवी कपूर यांच्यासोबत चक्क शिखर पहाडिया हा देखील दिसतोय. शिखर पहाडिया हा जान्हवी कपूर हिचा रूमर्ड बॉयफ्रेंड आहे. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जातंय. नेहमीच एकसोबत स्पाॅट होताना जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया दिसतात.

अंबानीच्या या पार्टीला जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याच्यासोबत दाखल झाली. नेहमीच शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर यांचे एकसोबतचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. हेच नाही तर काही दिवसांपूर्वीच हे तिरूपती बालाजी मंदिरात एकसोबत गेले होते. यावेळी खास लूकमध्ये जान्हवी कपूर ही दिसत आहे.

शिखर पहाडिया हा महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याचा नातू आहे. सुशील कुमार शिंदे हे शिखर पहाडिया याचे आजोबा आहेत. मध्यंतरी चर्चा होती की, लवकरच शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर हे लग्न करणार आहेत. हेच नाही तर शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर यांचा साखरपुडा झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर हे त्यांच्या नात्यावर भाष्य करणे टाळतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.