Tiger 3 Teaser | जब तक टाइगर मरा नहीं, तब तक.. टायगर 3 चा जबरदस्त टीझर पाहिलात का?

अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेला 'टायगर 3' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जवळपास दीड मिनिटाच्या या टीझरमध्ये सलमान आणि कतरिनाची झलक दाखवण्यात आली आहे.

Tiger 3 Teaser | जब तक टाइगर मरा नहीं, तब तक.. टायगर 3 चा जबरदस्त टीझर पाहिलात का?
Tiger 3Image Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Sep 27, 2023 | 12:35 PM

मुंबई | 27 सप्टेंबर 2023 : सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या आगामी ‘टायगर 3’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी ‘टायगर 3’चा दमदार टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान आणि कतरिनाची लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. त्यामुळे दोघांचे चाहते फार उत्सुक आहेत. ‘टायगर’ आणि ‘टायगर 2’ या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. ‘टायगर 3’च्या टीझरची सुरुवात सलमान खानच्या आवाजाने होते.

‘माझं नाव अविनाश सिंह राठोड आहे. पण तुम्हा सर्वांसाठी मी टायगर आहे’, अशा डायलॉगने या टीझरची सुरुवात होते. त्याचसोबतच सलमानचा दमदार लूक समोर येतो. या टीझरमध्ये टायगरच्या भूमिकेतील सलमान पुढे म्हणतो की, “मी 20 वर्षे सर्वकाही पणाला लावून देशाची सुरक्षा केली. त्याबदल्यात मी आजवर काहीच मागितलं नाही, पण आता मागतोय. आज तुम्हा सर्वांना असं सांगितलं जातंय की टायगर तुमचा शत्रू आहे. टायगर देशद्रोही आहे. टायगर शत्रू नंबर वन आहे. त्यामुळे 20 वर्षांच्या देशसेवेनंतर मी माझा कॅरेक्टर सर्टिफिकेट मागतोय. माझ्या मुलाला मी नाही तर इंडिया सांगणार की त्याचा बाप कोण होता? गद्दार की देशभक्त.” जवळपास दीड मिनिटाचा हा टीझर चित्रपटाच्या कथेविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण करतो.

हे सुद्धा वाचा

पहा टीझर

टायगर 3 या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होण्याआधी सलमान खानने मंगळवारी रात्री त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये सलमानचे फक्त डोळे दिसत होते. ‘एक संदेश देतो.. उद्या.. टायगरचा मेसेज उद्या सकाळी 11 वाजता’, असं त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.