Tiger Vs Pathaan | तब्बल 25 वर्षांनंतर सलमान-शाहरुख एकत्र; येतोय बॉलिवूडमधील मोठा चित्रपट

शाहरुख खान आणि सलमान खानच्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी बातमी आहे. कारण तब्बल 25 वर्षांनंतर ही जोडी ऑनस्क्रीन एकत्र झळकणार आहे. आगामी 'टायगर वर्सेस पठाण' या चित्रपटाच्या स्क्रिप्टला दोघांनी पसंती दर्शविली आहे.

Tiger Vs Pathaan | तब्बल 25 वर्षांनंतर सलमान-शाहरुख एकत्र; येतोय बॉलिवूडमधील मोठा चित्रपट
Salman Khan and Shah Rukh KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 16, 2023 | 3:42 PM

मुंबई | 16 सप्टेंबर 2023 :  यंदाचं वर्ष अभिनेता शाहरुख खानसाठी ‘लकी’ ठरतंय. या वर्षाच्या सुरुवातीलाच त्याचा ‘पठाण’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर नुकताच प्रदर्शित झाला ‘जवान’ हासुद्धा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरतोय. या दोन्ही चित्रपटानंतर आता शाहरुख त्याच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर महिन्यात ‘डंकी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. म्हणजेच एका वर्षात शाहरुखचे तीन चित्रपट प्रदर्शित होतील. यादरम्यान आणखी एका मोठा चित्रपटाबद्दल अपडेट समोर येत आहे. शाहरुख खान आणि सलमान खान ही सुपरहिट जोडी आता एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘टायगर वर्सेस पठाण’ या चित्रपटात किंग खान आणि बॉलिवूडचा भाईजान हे एकमेकांसमोर येणार आहेत. मार्च 2024 मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल.

‘टायगर वर्सेस पठाण’

‘टायगर वर्सेस पठाण’ या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करणार आहे. शाहरुख आणि सलमान यांना वेगवेगळ्या मीटिंगमध्ये बोलावून त्यांना कथा ऐकवण्यात आली होती. त्यानंतर दोघांनीही एकत्र काम करण्यास होकार दिला आहे. बॉलिवूडचे दोन मोठे स्टार्स या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. याचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशीही चर्चा होती की ‘टायगर 3’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाल्यानंतर आगामी ‘टायगर वर्सेस पठाण’ या चित्रपटाच्या कामाला सुरुवात होईल.

25 वर्षांनंतर एकत्र

‘टायगर वर्सेस पठाण’ या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल 25 वर्षानंतर शाहरुख खान आणि सलमान खानची जोडी ऑनस्क्रीन एकत्र झळकणार आहे. याआधी दोघांनी ‘करण अर्जुन’ या चित्रपटात एकत्र मुख्य भूमिका साकारली होती. या दोन मोठ्या कलाकारांना ऑनस्क्रीन एकत्र आणण्यासाठी तगड्या स्क्रिप्टची गरज होती. ती स्क्रिप्ट आता निर्मात्यांना मिळाली असून कलाकारसुद्धा तयार झाले आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल.

हे सुद्धा वाचा

सलमान आणि शाहरुखची जोडी नेहमीच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. त्यामुळे या दोन मोठ्या कलाकारांना पडद्यावर एकत्र पाहणं चाहत्यांसाठी पर्वणीच असेल. या चित्रपटाची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याचं कळतंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.