Tiktok Star | टिकटॉक स्टार सुरज चव्हाणची ‘गोलीगत’ भरारी, मराठी चित्रपटात झळकणार

टिकटॉक फेम सुरज चव्हाण (Suraj Chavan) आता सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनच्या प्रशांत शिंगटे (Prashant Shingate) निर्मित "का रं देवा" या आगामी मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सुरज चव्हाणचे सोशल मीडियावर (Social Media) लाखोंच्य संख्येने चाहते आहेत.

Tiktok Star | टिकटॉक स्टार सुरज चव्हाणची 'गोलीगत' भरारी, मराठी चित्रपटात झळकणार
सुरज चव्हाण आता एका चित्रपटात झळकणार आहे.
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 1:04 PM

मुंबई : एकाच वेळी लाखो लोकांशी आपल्या बोबड्या भाषेत संवाद साधणारा आणि तमाम लोकांना आपल्या “गोलीगत” आणि “बुक्कीत टेंगुळ” या प्रसिद्ध डायलॉगने आनंद देणारा टिकटॉक फेम सुरज चव्हाण (Suraj Chavan) आता सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनच्या प्रशांत शिंगटे (Prashant Shingate) निर्मित “का रं देवा” या आगामी मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. सुरज चव्हाणचे सोशल मीडियावर (Social Media) लाखोंच्या संख्येने चाहते आहेत. त्यांच्या बुक्कीत टेंगूळ या डायलॉगने तर पूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. आता हाच सुरज चित्रपटात अभिनय करणार आहे.

व्यंगच ठरले बलस्थान 

बारामती तालुक्‍यातील मोडवे गावचा रहिवासी असलेल्या सूरज चव्हाण याचे आयुष्य खूपच खडतर आहे. आई-वडिलांचे छत्र हरपलेला हा मुलगा अवघ्या महाराष्ट्राला आपले आई-वडील मानतो. लहानपणापासूनच तो बोबडा बोलतो. बोबडे बोलणे हे त्याचे शारीरिक व्यंग आहे. मात्र त्याचे व्यंगच त्याचे बलस्थान ठरले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने लोकांना आपलेसे केले. नवोदित कलाकारांच्या पाठीशी उभे राहणारे या चित्रपटाचे निर्माते प्रशांत शिंगटे यांची भेटही सुरज सोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली आणि त्यांनी सुरजला आपल्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली.

प्रेक्षकांना माझी भूमिका नक्कीच आवडेल 

टिकटॉकने मला रातोरात मोठे केले आणि मी जगभरात पोहचलो. प्रशांतजी मला स्वतः भेटायला माझ्या घरी आले आणि त्यांनी मला ही ऑफर दिली तेव्हा मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. लिहिता वाचता न येणाऱ्या माझ्यासारख्या मुलाला एक निर्माता शोधत घरापर्यंत पोहचतो ही कल्पनाच मी करू शकत नव्हतो. माझ्या शैलीला साजेशी अशी कॉलेजमधल्या मुलाची भूमिका मी साकारली असून प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे, अशी प्रतिक्रिया सुरज चव्हाणने दिली आहे.

चित्रपटात दिग्गज कलाकारांचा समावेश 

चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन रंजीत दशरथ जाधव यांचं आहे. अभिनेत्री मोनालिसा बागल, मयूर लाड, अभिनेते जयवंत वाडकर, अरुण नलावडे आणि नागेश भोसले यांच्या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

इतर बातम्या :‘पारु’ पोरकी झाली! पारंपरिक कोळीगीतांचा बादशाह हरपला, काशीराम चिंचय कालवश

Kapil Sharma Biopic | ग्रेट कॉमेडियन कपिल शर्माच्या जीवनावर लवकरच चित्रपट येणार, नावही ठरलं !

Varun Dhawan | राजकुमार हिरानींच्या नव्या चित्रपटात वरुण धवन साकारणार मुख्य भूमिका, चित्रपटाचं नाव एकदम हटके !

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.