David Warner: ‘टायटॅनिक’मधील अभिनेते डेव्हिड वॉर्नर यांचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

डेव्हिड हे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी (cancer) झुंज देत होते. त्यांनी 'टायटॅनिक'मध्ये दुष्ट नोकर स्पायसर लव्हजॉयची भूमिका साकारली होती.

David Warner: 'टायटॅनिक'मधील अभिनेते डेव्हिड वॉर्नर यांचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
David Warner: 'टायटॅनिक'मधील अभिनेते डेव्हिड वॉर्नर यांचं निधनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 10:02 AM

‘टायटॅनिक’ (Titanic) आणि ‘द ओमान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेले लोकप्रिय हॉलिवूड अभिनेते डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांचं निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. डेव्हिड हे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी (cancer) झुंज देत होते. त्यांनी ‘टायटॅनिक’मध्ये दुष्ट नोकर स्पायसर लव्हजॉयची भूमिका साकारली होती. डेव्हिड वॉर्नर यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. डेव्हिड यांचं रविवारी 24 जुलै रोजी लंडनमध्ये कर्करोगामुळे निधन झालं अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर आणि हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. डेव्हिड वॉर्नर यांनी दोन लग्न केले होते. आता त्यांच्या पश्चात पत्नी लिसा, मुलगा ल्यूक आणि सून, पहिली पत्नी हॅरिएट इव्हान्स असा परिवार आहे.

डेव्हिड यांनी आपले अखेरचे दिवस डॅनविले हिल, लंडन याठिकाणी राहून घालवले. मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हे एक निवृत्ती गृह आहे. डेव्हिड यांनी बहुतांश चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली. 1941 मध्ये मँचेस्टरमध्ये जन्मलेल्या डेव्हिड वॉर्नर यांनी ‘लिटिल माल्कम’, ‘ट्रॉन’, ‘टाइम बॅंडिट्स’, ‘स्टार ट्रेक’ आणि ‘द फ्रेंच लिटल वुमन’ यांसह अनेक चित्रपटांत काम केलं. ते 70 आणि 80 च्या दशकातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक होते.

हे सुद्धा वाचा

डेव्हिड वॉर्नर यांनी रॉयल शेक्सपियर कंपनीत खूप काम केलं. राजा हेन्री सहावा आणि किंग रिचर्ड 2 ची भूमिका साकारून ते स्टार बनले. डेव्हिड यांनी 1965 मध्ये शेक्सपियर कंपनीसाठी हॅम्लेटची भूमिका साकारली होती. त्यांनी टीव्हीच्या दुनियेतही खूप काम केलं. 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मॉर्गन: अ सुटेबल केस फॉर ट्रीटमेंट’ या चित्रपटासाठी त्यांना ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कारासाठीचं नामांकन मिळालं होतं. 1981 मध्ये डेव्हिड यांनी टीव्ही मिनी-सीरिज ‘मसाडा’साठी एमी अवॉर्ड देखील जिंकला होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.