TMKOC | लैंगिक शोषणाबाबत ‘तारक मेहता..’च्या मिसेस रोशन सोढी इतके दिवस गप्प का होत्या?

"सिंगापूरमध्ये शूटिंग सुरू असताना माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. तेव्हा रात्री ते म्हणाले, आता तुझ्या लग्नाचा वाढदिवस संपला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची आरोपी भावना मनात ठेवू नकोस. माझ्या रुममध्ये ये.."

TMKOC | लैंगिक शोषणाबाबत 'तारक मेहता..'च्या मिसेस रोशन सोढी इतके दिवस गप्प का होत्या?
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 5:10 PM

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसिवालने तब्बल 15 वर्षांनंतर मालिकेला रामराम केला. मात्र यावेळी तिने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. निर्माते असितकुमार मोदी यांनी लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक आरोप जेनिफरने केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ती मालिकेतून गायब आहे. त्यामुळे जेनिफर इतके दिवस मौन बाळगून का होती, असा सवाल अनेकांनी केला. इतके दिवस ती याविषयी का व्यक्त झाली नाही, यावर तिने प्रतिक्रिया दिली आहे.

जेनिफर इतके दिवस का गप्प होती?

“मी दोन महिने शांत होते आणि त्याविषयी कोणालाच काही बोलले नाही. आजही मी बोलण्यास तयार नव्हते कारण मला त्या मालिकेनं सगळं काही दिलंय. नाव, प्रसिद्धी, पैसा आणि त्या सर्व गोष्टींसाठी मी कृतज्ञ आहे. पण इतके वर्षे मी ज्या गोष्टींमधून गेले, त्याबद्दल लोकांना समजावं म्हणून मी व्यक्त झाले. तारक मेहताच्या टीममधील प्रत्येक व्यक्ती ही जणू बांधिल कामगारच आहे”, असं ती म्हणाली.

मागील काही घटनांबद्दल बोलताना तिने पुढे सांगितलं, “भूतकाळात अनेक गोष्टी घडल्या होत्या. पण परिस्थिती बदलेल या विचाराने मी शांत होते. माझ्या गरोदरपणात मला मालिका सोडायची नव्हती. पण गुरुचरण सिंगने (रोशन सोढीची भूमिका साकारलेला अभिनेता) मालिका सोडली म्हणून काढून टाकण्याचा विचार झाला. मी त्यांच्याकडे अनेकदा विनंती केली आणि कथेत बदल करण्याचाही सल्ला दिला होता. पण त्यांनी मला मालिका सोडण्यास भाग पाडलं. गरोदरपणात नवव्या महिन्यापर्यंत मी काम करायला तयार होते, पण त्यांनी मला मालिका सोडण्यास भाग पाडलं. 15 वर्षे काम करूनही अनेकदा माझी हाफ डेची सॅलरी कापण्यात आली. सतत मानसिक आणि शारीरिक शोषण सुरू होतं.”

हे सुद्धा वाचा

“माझ्या रुममध्ये ये, आपण दोघं व्हिस्की पिऊ”

लैंगिक शोषणाच्या आरोपांबद्दल जेनिफरने सिंगापूरच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला. “निर्माते असितकुमार मोदी यांनी अनेकदा माझ्यासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला. सिंगापूरमध्ये शूटिंग सुरू असताना माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. तेव्हा रात्री ते म्हणाले, आता तुझ्या लग्नाचा वाढदिवस संपला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची आरोपी भावना मनात ठेवू नकोस. माझ्या रुममध्ये ये, आपण दोघं व्हिस्की पिऊ. अशा पद्धतीचे कमेंट्स त्यांनी एकदा नाही तर अनेकदा केले आहेत. एकदा तर त्यांनी मला सेक्सी म्हणत माझे गाल खेचले”, असे आरोप जेनिफरने केले आहेत.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.