TMKOC | ‘माझ्यासोबत शारीरिक संबंध..’; ‘तारक मेहता’च्या निर्मात्यांवरील गंभीर आरोपांबाबत भडकली जेनिफर

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका एका वादामुळे चर्चेत आली आहे. यामध्ये रोशन सोढीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्रीने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले. तर निर्माते असितकुमार मोदी यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

TMKOC | 'माझ्यासोबत शारीरिक संबंध..'; 'तारक मेहता'च्या निर्मात्यांवरील गंभीर आरोपांबाबत भडकली जेनिफर
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 01, 2025 | 3:31 PM

मुंबई : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या काही दिवसांपासून सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत आहे. या मालिकेत मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसिवालने निर्माते असितकुमार मोदी आणि प्रॉडक्शन टीममधील इतर सदस्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. जेनिफरने केलेले सर्व आरोप असित मोदी यांनी फेटाळले आहेत. तर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जेनिफरने आरोपांबाबत काही गोष्टी स्पष्ट करत सोशल मीडियावरील तथ्यहीन चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

असित मोदी यांनी माझं शारीरिक शोषण केलं नाही तर मौखिक रुपात मला त्रास दिला, असं जेनिफरने म्हटलंय. यासोबतच त्यांनी हात जोडून माफी मागितली पाहिजे, अशी मागणी तिने केली आहे. जेनिफर गेल्या 15 वर्षांपासून ‘तारक मेहता..’ या मालिकेत काम करतेय. मात्र दोन महिन्यांपूर्वीच तिने ही मालिका सोडली.

ANI शी बोलताना जेनिफर म्हणाली, “जेव्हा मी माध्यमांसमोर येऊन सत्य सांगितलं तेव्हा असितकुमार मोदी, प्रोजेक्ट हेड सोहैल रमाणी आणि कार्यकारी निर्माते जतिन बजाज यांनी माझ्यावर प्रोफेशनल न राहिल्याचा आरोप केला. मी हे स्पष्ट करू इच्छिते की काही लोक तथ्यहीन गोष्टी पसरवत आहेत. असितजींनी माझं शारीरिक शोषण केलं नाही. त्यांनी मौखिक रुपात मला त्रास दिला आहे. मी जोडून विनंती करते की अशा गोष्टींना महत्त्व देऊ नका आणि माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नका.”

हे सुद्धा वाचा

“मी हे सर्व पैशांसाठी करत नाहीये. मी सत्याच्या विजयासाठी हे सर्व करतेय. ते माझ्यासोबत चुकीचं वागले, हे त्यांना कबुल करावं लागेल. त्यांना हात जोडून माझी माफी मागावी लागेल”, असंही ती पुढे म्हणाली.

जेनिफरचे निर्मात्यांवर आरोप

निर्मात्यांवर आरोप करत जेनिफर म्हणाली, “असित मोदी यांनी याआधीही लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण मला काम गमावण्याची भिती होती. पण आता पुरे झालं. त्यांनी मला सेटवर बळजबरीने थांबवण्याचा प्रयत्न केला. गेट बंद करून मला बाहेर जाण्यापासून रोखलं. महिनाभरापूर्वी मी मेलद्वारे तक्रार केली होती, पण त्यावर मला काहीच उत्तर मिळालं नाही. मला खात्री आहे की ते या आरोपांचा तपास करतील. मी वकिलाची नियुक्ती केली आहे आणि मला लवकरच न्याय मिळेल.”

निर्माते असितकुमार मोदी यांची प्रतिक्रिया-

“ती आमची आणि मालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू. आम्ही तिचा करार संपवल्याने ती आता तथ्यहीन आरोप करतेय”, असं असितकुमार मोदी म्हणाले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.