‘भिडे मास्तरांची लेक बिघडली’; ‘तारक मेहता..’मधील सोनूचा बिकिनी अवतार पाहून नेटकरी अवाक्!

निधीने काही वर्षांपूर्वीच 'तारक मेहता..' ही मालिका सोडली. मात्र सोनूच्या भूमिकेमुळे ती चांगलीच लोकप्रिय झाली होती. म्हणूनच इन्स्टाग्रामवरही तिचे बरेच फॉलोअर्स आहेत. तिचा स्वत:चा युट्यूब चॅनलसुद्धा आहे.

'भिडे मास्तरांची लेक बिघडली'; 'तारक मेहता..'मधील सोनूचा बिकिनी अवतार पाहून नेटकरी अवाक्!
Nidhi BhanushaliImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 10:21 AM

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय मालिकेनं गेली जवळपास 15 वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या 15 वर्षांच्या कालावधीत मालिकेतील बऱ्याच भूमिका बदलल्या. यामध्ये लहान मुलांची भूमिका साकारणारे कलाकार आता मोठे झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांचा बदललेला अवतार पाहून अनेकदा चाहते थक्क होतात. मालिकेत भिडे मास्तरांची मुलगी सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी भानुशालीसोबत असंच काहीसं घडलंय. निधी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असून चाहत्यांसोबत ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. निधीला वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करणं खूप आवडतं. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. यातील निधीचा बिकिनी लूक पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

या फोटोंमध्ये निधीने निळ्या आणि काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. पाण्यात ती तिच्या मित्रासोबत फोटोसाठी पोझ देताना दिसतेय. एका फोटोमध्ये ती त्याच्या खांद्यावर उभी आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये ती मित्राच्या खांद्यावर बसली आहे. निधीच्या या फोटो आणि व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘हमारे जमाने मै..’ असा डायलॉग एका युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिला आहे. मालिकेत सोनूचे वडील आत्माराम भिडे यांच्या तोंडी हा डायलॉग खूप प्रसिद्ध होता. तर ‘भिडे मास्तरांची मुलगी बिघडली’ असंही दुसऱ्याने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो आणि व्हिडीओ

निधीने काही वर्षांपूर्वीच ‘तारक मेहता..’ ही मालिका सोडली. मात्र सोनूच्या भूमिकेमुळे ती चांगलीच लोकप्रिय झाली होती. म्हणूनच इन्स्टाग्रामवरही तिचे बरेच फॉलोअर्स आहेत. तिचा स्वत:चा युट्यूब चॅनलसुद्धा आहे. त्यावर ती फिरतानाचे बरेच व्हिडीओ पोस्ट करत असते.

निधीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून तिने अफाट प्रसिद्धी मिळवली. यानंतर तिने 2019 मध्ये उच्च शिक्षणासाठी ही लोकप्रिय मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता मालिकेत ‘सोनू’ची भूमिका अभिनेत्री पलक सिधवानी साकारत आहे. निधीपूर्वी ‘सोनू’ची भूमिका अभिनेत्री झील मेहता साकारत होती.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.