TMKOC: सगळीकडेच चर्चा, काजल असेल ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची नवी दयाबेन! निर्माते म्हणाले,”अरे पण ही कोण?”

अनेक दिवसांपासून दिशा या शोमध्ये एंट्री करणार असल्याची चर्चा होती. पण तसे झाले नाही. त्याचवेळी, काजल पिसाळ (Kajal Pisal) या शोची नवीन दयाबेन होणार असल्याची बातमी आहे, त्यावर प्रतिक्रिया देत असित मोदींनी यामागचं सत्य सांगितले आहे.

TMKOC: सगळीकडेच चर्चा, काजल असेल 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ची नवी दयाबेन! निर्माते म्हणाले,अरे पण ही कोण?
TMKOC Kajal Pisal new daya ben?Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 5:12 PM

तारक मेहता हा टेलिव्हिजनचा सर्वात लोकप्रिय शो आहे. शोमधील प्रत्येक व्यक्तिरेखा लोकांच्या हृदयात खास बनली आहे. दयाबेन हे देखील यातील एक महत्त्वाचे पात्र आहे. तारक मेहतामध्ये (Tarak Mehta) नव्या दयाबेनच्या (Dayaben) रुपात एका नव्या अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे. याबाबतीत बरीच चर्चा सुरु आहे. खरंच तारक मेहता का उल्टा चष्माला नवीन दयाबेन मिळाली आहे का? दिशा वकानी पहिल्या शोमध्ये दयाबेनची भूमिका साकारत होती. अनेक दिवसांपासून दिशा या शोमध्ये एंट्री करणार असल्याची चर्चा होती. पण तसे झाले नाही. त्याचवेळी, काजल पिसाळ (Kajal Pisal) या शोची नवीन दयाबेन होणार असल्याची बातमी आहे, त्यावर प्रतिक्रिया देत असित मोदींनी यामागचं सत्य सांगितले आहे.

दयाबेन मिळाली?

‘तारक मेहता’ हा सर्वात लोकप्रिय टेलिव्हिजन शो आहे. शोमधील प्रत्येक व्यक्तिरेखा लोकांच्या हृदयात खास बनली आहे. दयाबेनचे पात्र हे देखील यातील एक महत्त्वाचे पात्र आहे. त्याचबरोबर टीव्ही अभिनेत्री काजल पिसाळ ‘तारक मेहता’मध्ये नवीन दयाबेनच्या भूमिकेत एंट्री घेणार आहे. एका वृत्त पत्रामधील वृत्तानुसार, दयाबेनच्या भूमिकेसाठी काजल पिसाळला फायनल करण्यात आले आहे.

शोचे निर्माते असित मोदी म्हणाले,

काजल पिसाळच्या आधीही अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली होती, मात्र अद्याप एकाही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. त्याचबरोबर काजल पिसाळ ‘तारक मेहता’मध्ये दयाबेनची भूमिका साकारताना दिसणार असल्याची चर्चा आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना शोचे निर्माते असित मोदी यांनी या काजल पिसाळच्या चर्चांना पूर्णविराम लावला. याबद्दल बोलताना शोचे निर्माते असित मोदी म्हणाले की, या बातमीत तथ्य नाही. ही अफवा कोण पसरवत आहे हे मला माहीत नाही. काजल पिसाळ कोण आहे मला माहीत नाही, मी भेटलोही नाही. यापूर्वीही अनेक अभिनेत्रींची नावे घेतली गेली आहेत, ज्यांची मला माहिती नाही. त्याचवेळी दयाबेनच्या पात्राच्या ऑडिशनवर असित म्हणतो, ऑडिशन सुरू आहेत. आम्ही अद्याप कोणालाही फायनल केलेले नाही. दयाचे कास्टिंग झाल्यावर ही बातमी मी स्वतः सर्वांसमोर आणीन. आम्ही त्याची अधिकृत घोषणा करू.

…तरी आपण आनंदी असू

काजल पिसाळ ही एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आहे जी बडे अच्छे लगते हैं, नागिन 5 आणि साथ निभाना साथिया सारख्या शोमध्ये दिसली आहे. काजल पिसाळ शेवटची फक्त तुम या मालिकेत दिसली होती. काही दिवसांपूर्वी या शोचे निर्माते असित मोदी यांनी तारक मेहता शो सुरूच राहणार असल्याचे सांगितले होते. नवीन लोक आले तरी आपण आनंदी असू आणि जुने आले तरी आपण आनंदी आहोत असंही ते म्हणाले होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.