Omprakash : भैय्या म्हटल्यावर तक्रार करणाऱ्या आणि तब्बल 350 भूमिका साकारणाऱ्या ओमप्रकाश यांची रंजक कहाणी

आज दिग्गज अभिनेते ओमप्रकाश यांचा स्मृतीदिवस. ओमप्रकाश यांचा जन्म 19 डिसेंबरला 1919 झाला. अभिनेते ओमप्रकाश याचे पूर्ण नाव ओम प्रकाश बक्शी. त्यांचं शिक्षण लाहोरमध्ये झाले होते.

Omprakash : भैय्या म्हटल्यावर तक्रार करणाऱ्या आणि तब्बल 350 भूमिका साकारणाऱ्या ओमप्रकाश यांची रंजक कहाणी
ओमप्रकाश यांचा स्मृतीदिनImage Credit source: मोव्हीज अॅन्ड मेमरीज ट्विटर
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 8:00 AM

मुंबई : आपल्या देशात चित्रपट आणि चित्रपटातील (Movies) कलाकारांवर प्रेम करणाऱ्यांची परंपरा मोठी आहे. त्यामुळे भारतीय चित्रपट सृष्टीचे (Bollywood) जगात एवढे मोठे नाव आहे. चित्रपटातील अभिनेत्यांची फक्त फॅन नाही तर भक्तही फक्त भारतातच तु्म्हाला दिसती. म्हणूनच तुम्हाला साऊथमध्ये गेल्यावर सुपरस्टार रजनिकांत (Rajnikant) यांची मंदिरही दिसतील. आज आम्ही तुम्हाला एका अभिनेत्याच्या स्मृतीदिनी तुम्हाला अशीच एका अभिनेत्याची रंजक काहणी सांगणार आहोत. जो अभिनेता भैय्या म्हटल्यावर तक्रार करायचा. या अभिनेत्याने थोड्या तितक्या नाही तर तब्बल साडेतीनशे पेक्षा जास्त चित्रपटात आपल्या अभिनयाने ठसा उमटवला आणि चित्रपट सृष्टीत आपली उंची वाढवली. या अभिनेत्याचे चित्रपट आजच्या मॉडर्न जमाण्याच्या प्रेक्षकांनाही भुरळ घालतात. ज्याचे चित्रपट आजही मोठ्या आवडीने पाहिले जातात.

जबरदस्त अभिनेत्याची कारकिर्द

आज दिग्गज अभिनेते ओमप्रकाश यांचा स्मृतीदिवस. ओमप्रकाश यांचा जन्म 19 डिसेंबरला 1919 झाला. अभिनेते ओमप्रकाश याचे पूर्ण नाव ओम प्रकाश बक्शी. त्यांचं शिक्षण लाहोरमध्ये झाले होते. त्यांना लहानपणापासूनच संगीताची जास्त आवड होती. स्वातंत्र्यांच्या आगोदरच्या काळात ओमप्रकाश हे केवळ पंचवीस रूपये पगाराची नोकरी करत होते. ऑल इंडिया रेडिओ सिलोनध्ये त्यांनी काम केलं. याच रेडिओवर त्यांचा फतेहदिन हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय ठरला आणि तिथून त्यांचे नाव लोकप्रिय होण्यास सुरूवात झाली. त्यानंतर त्यांनी चित्रपट क्षेत्रात प्रदार्पण केलं आणि तो त्यांच्या लाईफचा टर्निंग पॉइंट ठरला. तिथून त्यांची कारकिर्द बहरू लागली.

कोणत्या भूमिका हीट ठरल्या

ओमप्रकाश यांनी थोड्या तितक्या नाही तर तब्बल साडेतीनशे चित्रपटात विविध भूमिका साकरल्या आहेत. पडोसन, जुली, दस लाख, चुपके-चुपके, बैराग, शराबी, नमक हलाल, प्यार किए जा, खानदारन, चौकीदार, लावारिस, आंधी लोफर, जंजीर, अशा अनेक चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी अभिताभ बच्चन यांच्याबरोबर अभिनयाची चांगली घडी बसवली होती. नमक हलाल मध्ये दद्दू, शराबीत मुंशीलाल या व्यक्तीरेखा तर प्रचंड लोकप्रिय ठरल्या आहेत. त्यांना तरूण वयात असण्यापासून भय्या म्हणण्यावर आक्षेप होता. त्याबाबत ते अनेकदा तक्रारही करत असत. अशा या दिग्गज अभिनेत्याचे निधन 21 फेब्रुवारी 1998 ला झाले. आणि एका मोठ्या चित्रपट कारकिर्दीचा अंत झाला.

फरहानच्या लग्नात ह्रतिकने पुन्हा धरला ‘सेनोरिटा’वर ठेका; जिंदगी ना मिलेगी दोबारातील डान्स रिक्रिएट

फरहानच्या लग्नाची होणार जंगी पार्टी; दिग्गज कलाकार लावणार उपस्थिती

अभिनेत्री जायरा वसीमची हिजाबच्या वादामध्ये उडी, भली मोठी पोस्ट शेअर करत म्हणाली की…मी संपूर्ण व्यवस्थेचा विरोध करते…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.