Birthday Special | असं काय कारण होतं की ज्यामुळे नाना पाटेकर आपल्या पहिल्या मुलापासून दूर राहात!
आज 1 जानेवारी नाना पाटेकर यांचा वाढदिवस नाना आज आपला 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
मुंबई : आज 1 जानेवारी नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा वाढदिवस नाना आज आपला 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत. नाना पाटेकर आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्याच्या चित्रपटांचे अनेक संवाद आजही लोकांना आठवतात. आज नाना पाटेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहोत. हा किस्सा त्यांच्या पहिल्या मुलाशी संबंधित आहे. खरंतर असे म्हटले जाते की, एक काळ असा होता की, नाना आपल्या पहिल्या मुलापासून खूप दूर राहात होते. मात्र, त्याचे नेमके कारण काय होते हे आपण पाहूयात. (Today is Nana Patekar’s 70th birthday)
मीडिया रिपोर्टनुसार नानाच्या पहिल्या मुलाच्या शरीरामध्ये काही दोष होते. जन्मताच त्याचा ओठ कापलेला होता, त्यामुळे नाना खूप निराश झाले होते. त्यांची पत्नी आई असल्यामुळे ती मुलापासून दुर राहु शकली नाही. मात्र, मुलांपासून नाना दुर राहण्याचा प्रयत्न करत होते. असे म्हणतात की, त्यांनी आपल्या मुलाला खायला घातले नाही, किंवा त्यांच्या जवळही कधी बसले नाहीत. एक दिवस असे काहीतरी घडले की स्वतः नानासुद्धा आपल्या मुलापासून लांब राहू शकले नाही.
रिपोर्टनुसार, एक दिवस नाना आणि त्याचा मुलगा घरी एकटे होते. त्यादिवशी असे काहीतरी घडले आणि त्यादिवशापासून नाना आपल्या मुलापासून दूर राहु शकले नाहीत. त्यांची निराशा तेथेच संपली मात्र, त्यानंतर काही दिवसात त्यांच्या मुलांची तब्येत बिघडत गेली आणि त्याच्यावर बरेच उपचार करण्यात आले पण त्याचा काहीच फायदा झाला नाही आणि तो जगाला निरोप देऊन गेला त्यानंतर मुलाच्या मृत्यूने नाना हादरले ते तुटले होते. मग काही काळानंतर त्यांच्या पत्नीने दुसर्या मुलाला जन्म दिला, त्यानंतर नाना पाटेकर पुन्हा आनंदी झाले.
संबंधित बातम्या :
Nana Patekar | नाना पाटेकर सुशांत सिंहच्या पाटण्याच्या घरी, वडिलांचे सांत्वन करताना भावूक
(Today is Nana Patekar’s 70th birthday)