Sai Dharam Tej Accident : टॉलिवूड अभिनेता साई धरम तेज अपघातात गंभीर जखमी

साई धरम तेज त्याच्या 18 लाखांच्या 1160 सीसी स्पोर्ट्स बाईकवर रायदुर्गम केबल पुलावरून आयकियाकडे जात होता, तेव्हा अचानक घसरुन खाली पडल्यानं जखमी झाला.

Sai Dharam Tej Accident : टॉलिवूड अभिनेता साई धरम तेज अपघातात गंभीर जखमी
साई धरम तेज
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 8:06 AM

हैदराबाद: टॉलिवूड अभिनेता साई धरम तेज शुक्रवारी एका रस्ता अपघातात जखमी झाला. साई धरम तेज त्याच्या 18 लाखांच्या 1160 सीसी स्पोर्ट्स बाईकवर रायदुर्गम केबल पुलावरून आयकियाकडे जात होता, तेव्हा अचानक घसरुन खाली पडल्यानं जखमी झाला. साई धरम तेजला बेशुद्ध अवस्थेत मेडिकओव्हर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, त्याच्या डोळ्याजवळ, छातीवर आणि पोटाजवळ जखमा झाल्या, पण तो आता धोक्याबाहेर आहे.

मेडिकोव्हर रुग्णालयात उपचार केल्यानंतर साई धरम तेजला अपोलो रुग्णालयात हलवण्यात आले. अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मतानुसार तो धोक्याबाहेर आहे, त्याला डोके, पाठीचा कणा यासारख्या अवयवांना कोणतीही अंतर्गत दुखापत झालेली नाही. साईला पुढील 48 तास व्हेंटिलेटरवर निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, तसेच तो लवकरच बरा होईल असे सांगण्यात आलं आहे.

अपघाताचा व्हिडीओ

चिरंजीवींसह तेलुगू अभिनेते रुग्णालयात

साई धरम तेज यानं स्पोर्ट्स बाईकवरुन जाताना चांगले हेल्मेट घातले होते, त्यामुळे त्याच्या डोक्याला कोणतीही इजा झाली नाही.साई धरम तेज हा अभिनेते चिरंजीवी यांचा नातेवाईक कुटुंबातील आहे. साई चिरंजीवीच्या बहिणीचा मुलगा आहे. टॉलिवूडमध्ये साई धरम तेजने अल्पावधीत खूप नाव कमावले आहे. प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी, पवन कल्याण, अल्लू अरविंद, नागाबाबू यांनी रुग्णालयात जाऊन साई धरमतेज याच्या प्रकृतीची विचारपूस केली. धरमतेज सध्या धोक्याबाहेर असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, साई धरम तेज यांच्या दुचाकी अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. अपघातावेळी साई धरमतेज खूप वेगाने दुचाकी चालवत नव्हता, परंतु अचानक तोल सुटल्याने त्याची दुचाकी घसरली आणि तो खाली पडल्याचं दिसतंय. अपोलो रुग्णालयानं साई धरमतेजच्या प्रकृतीविषयी मेडिकल बुलेटिन जारी केलं आहे. चिरंजीवी यांनी ते ट्विट केले असून साई धरम तेज लवकरच बरा होईल, असं त्यांनी सांगितलं आहे.

इतर बातम्या:

Happy Birthday Tulip Joshi | यशराज फिल्म्समधून बॉलिवूडमध्ये पदार्पण, लग्नानंतर करोडोंचा व्यवसाय सांभाळतेय ट्युलिप जोशी!

‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’, तरुणाईचं भावविश्व स्टोरीटेलच्या ऑडिओबुकमध्ये!

Happy Birthday Shriya Saran | रजनीकांतची रील लाईफ पत्नी म्हणून चर्चेत आली अभिनेत्री, वाचा श्रिया सरनबद्दल…

Tollywood actor Sai Dharam Tej injured in road accident condition out of danger said by Apollo Hospital Press Statement

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.