Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Allu Arjun: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’सह अनेक चित्रपटांचं शूटिंग रखडलं; जाणून घ्या काय आहे कारण?

चित्रपट निर्मात्यांनी ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या निर्मितीचं नियोजन केलं होतं. मात्र निर्मात्यांनी संपाला पाठिंबा देत प्रकरण निकाली निघेपर्यंत स्थगिती दिली आहे.

Allu Arjun: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'सह अनेक चित्रपटांचं शूटिंग रखडलं; जाणून घ्या काय आहे कारण?
PushpaImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 4:31 PM

तेलुगू निर्मात्यांच्या संपामुळे अनेक तेलुगू चित्रपटांची निर्मिती (Telugu Movies) रखडली आहे. साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) पुष्पा 2 हासुद्धा रखडलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. ‘पुष्पा: द राइज’ या सुपरहिट चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. चित्रपट निर्मात्यांनी ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या निर्मितीचं नियोजन केलं होतं. मात्र निर्मात्यांनी संपाला पाठिंबा देत प्रकरण निकाली निघेपर्यंत स्थगिती दिली आहे. चित्रपटाचं शूटिंग कधी सुरू होईल यावर पुष्पाचे (Pushpa 2) निर्माते वाय रविशंकर म्हणाले की ते संप संपण्याची आणि प्रकरण मिटण्याची वाट पाहतील. “तेलुगू इंडस्ट्रीत संप सुरू आहे. संप संपल्यानंतर आम्ही ऑगस्टच्या अखेरीस सुरुवात करू किंवा जेव्हा संप संपेल तेव्हा शूटिंग सुरू केलं जाईल. निर्मात्यांच्या मुद्द्यावर चेंबरने संप पुकारल्यामुळे आम्ही शूट करू शकत नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं. पुष्पाच्या सीक्वेलसोबत इतरही दाक्षिणात्य चित्रपटांचं शूटिंग रखडलं आहे.

दिग्दर्शक सुकुमार यांच्या जवळच्या एका सूत्राने सांगितलं की, चित्रपट निर्मात्यांना विश्वास आहे की हे प्रकरण लवकरच सोडवलं जाईल आणि चित्रपटाचं शूटिंग सप्टेंबरच्या सुरुवातीला सुरू होईल. निर्माते शूटिंग सुरू करण्यासाठी सज्ज होते, मात्र आता ते संप मिटण्याची वाट पाहत आहेत.

हे सुद्धा वाचा

तेलुगू निर्मात्यांसमोर अनेक समस्या

तेलुगू चित्रपट उद्योगातील निर्मात्यांनी त्यांच्या समस्यांचं निराकरण होईपर्यंत सर्व चित्रपटांचं शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादन खर्च वाढला आहे, प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाहीत, तिकिटांच्या किमतींबाबतचे नियम आणि OTT प्लॅटफॉर्मवरील वाढती आव्हाने, या समस्यांचा सामना करावा लागत असल्याने निर्मात्यांनी संप पुकारला आहे.

पहा अल्लू अर्जुनचा नवीन लूक

पुष्पा: द राइज हा चित्रपट डिसेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑपिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला. आता त्याचा सीक्वेल 2023 मध्ये चित्रपटगृहात येण्याची शक्यता आहे. अलीकडेच अल्लू अर्जुनने इन्स्टाग्रामवर त्याचा नवीन लूक शेअर केला, जो सोशल मीडियावर खूप ट्रेंडमध्ये होता. पुष्पा 2 मधील हा त्याचा हा लूक असू शकतो, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.

एकनाथ शिंदे - अमित शाहांची तासभर बंद दाराआड चर्चा
एकनाथ शिंदे - अमित शाहांची तासभर बंद दाराआड चर्चा.
आरोपी विशाल गवळीच्या आईने केला मोठा आरोप
आरोपी विशाल गवळीच्या आईने केला मोठा आरोप.
महाराष्ट्राचे भूषण गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश होणार
महाराष्ट्राचे भूषण गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश होणार.
राणे -ठाकरेंमध्ये तापलं कोंबडीवड्यांचं राजकारण
राणे -ठाकरेंमध्ये तापलं कोंबडीवड्यांचं राजकारण.
औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा द्यायचा होता तर दंगली का घडवल्या?
औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा द्यायचा होता तर दंगली का घडवल्या?.
अजितदादांनी घेतला सूरज चव्हाणच्या घरच्या कामाचा आढावा
अजितदादांनी घेतला सूरज चव्हाणच्या घरच्या कामाचा आढावा.
कल्याण अत्याचार प्रकरण; आरोपीने कारागृहात स्वत:ला संपवलं
कल्याण अत्याचार प्रकरण; आरोपीने कारागृहात स्वत:ला संपवलं.
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.