“श्रीवल्ली मेरी बायको, पुरी दुनियाको दिखाएगा…” ‘पुष्पा 2’ चा धमाकेदार ट्रेलर; रोमान्सपासून ते एक्शनपर्यंत सर्वच खतरनाक!

पुष्पा २ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अल्लू अर्जुनचा जबरदस्त लूक आणि अॅक्शनने प्रेक्षकांची उत्सुकता शिखरावर पोहोचली आहे. रश्मीका मंदाना आणि फहाद फासिल यांचेही वेगळे अंदाज पाहायला मिळतोय.

श्रीवल्ली मेरी बायको, पुरी दुनियाको दिखाएगा... 'पुष्पा 2' चा धमाकेदार ट्रेलर; रोमान्सपासून ते एक्शनपर्यंत सर्वच खतरनाक!
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 8:24 PM

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ पाहण्यासाठी सर्वच प्रेक्षकांना आतुरता आहे. पुष्पा 2 मधील अल्लू अर्जुनचा पहिला लूक आल्यापासून तर प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची उत्सुकता अजून वाढली आहे. ‘पुष्पा’ च्या पहिल्या भागातील डायलॉग्स, गाणी, अल्लू अर्जुनची स्टाईल या सर्वांमुळे या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. तीन वर्षानंतर या सिनेमाचा दुसरा भाग रिलीज होणार असून चित्रपटाचा ट्रेलर पटनामध्ये मोठ्या सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला.

‘पुष्पा 2’ चा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ट्रेलरमध्ये पुष्पाचे तेच राज्या आणि जबरदस्त अ‍ॅक्शन, डायलॉग पाहायला मिळतात. तसेच रश्मीका मंदानाचाही वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. तसेच ‘पुष्पा फायर नाही वाईल्ड फायर है’ हा ट्रेलर मधील डायलॉग सुद्धा पुष्पाच्या पात्राची शान वाढवतोय.

‘पुष्पा २ द रुल’चा 2.48 सेकंदाचा ट्रेलर खरच वाईल्ड फायर आहे. जंगलात काळोखात हत्तींच्या आवजात सुरु होणाऱ्या ट्रेलरमध्ये ‘पुष्पा’ प्रमाणेच लाल चंदन त्याची तस्करी आणि त्यातून येणारे पैसे दाखवले आहे, सिनेमाच्या नावाप्रमाणे ‘पुष्पा’ या सिनेमात राज्य करताना दिसणार आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला पुष्पा कोण आहे ? असा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर तो एक ब्रँड असल्याचं ट्रेलरमध्ये दाखवलं गेलं आहे. याच डायलॉसह ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुनची ग्रँड एंट्री दाखवण्यात आली आहे.

रश्मीका मंदानाच पात्रही एका वेगळ्याच अंदाजात दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर चित्रपटात खलनायकाचे पात्र असलेला फहाद फासिलची एंट्री ही तशीच दमदार दाखवण्यात आली आहे. पुष्पाच्या माणसांना मारत त्याच्यासाठी एक आव्हान निर्माण करत असल्याचे या ट्रेलरमध्ये दिसते. फहाद फासिलबरोबरच सिनेमातील सगळ्या व्हिलनचे दृश्य दाखवले गेले असून एकटा पुष्पा आणि बाकी सर्व अशी अॅक्शन बघायला मिळणार आहे.

दरम्यान पुष्पाच्या पहिल्या भागात हिंदीमध्ये पुष्पासाठी आवाज दिलेला मराठमोळा श्रेयस तळपते दुसऱ्या भागातही तोच पुष्पाचा आवाज असणार का? असे प्रश्न निर्माण करण्यात आले होते.पण दुसऱ्या भागातही पुष्पाचे सर्व डायलॉग मराठमोळ्या श्रेयस तळपतेच्या आवाजात ऐकू येणार आहेत हे लक्षात येतं. तसेच “श्रीवल्ली मेरी बायको, पुरी दुनियाको दिखाएगा…” हा ट्रेरलमधील डायलॉगही सध्या खूप गाजतोय.

ट्रेलरच्या शेवटी सिनेमा कसा असेल हे डायलॉग आणि अॅक्शनवरूनच लक्षात येत आहे. ट्रेलरनंतर तर प्रेक्षकांची उत्सुकता अजून वाढली आहे. सिनेमा 5 डिसेंबर 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. म्हणजे ‘पुष्पा 2’ प्रेक्षकांसाठी नवीन वर्षाचे गिफ्टच ठरणार असं दिसतंय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.