ट्रांसजेंडर समोर येताच कशी होती ऐश्वर्य राय हिची प्रतिक्रिया, लेक आराध्या हिला देखील सांगितलं…

aishwarya rai : ऐश्वर्या - आराध्या सोबत झालेली 'ती' भेट ट्रांसजेंडर कधीच विसरु शकणार नाही... अनेक दिवसांनंतर मोठं सत्य अखेर समोर आलंच..., तेव्हा नक्की काय झालं होतं? सध्या सर्वत्र ऐश्वर्या राय आणि ट्रांन्सजेंडरची चर्चा...

ट्रांसजेंडर समोर येताच कशी होती ऐश्वर्य राय हिची प्रतिक्रिया, लेक आराध्या हिला देखील सांगितलं...
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 10:50 AM

मुंबई | 12 जानेवारी 2024 : अभिनेत्री ऐश्वर्या राय कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ऐश्वर्या हिच्या प्रमाणेच बच्चन कुटुंबाची लेक आराध्या बच्चन देखील कायम चर्चत असते. अनेक ठिकाणी ऐश्वर्या आणि आराध्या यांना एकत्र स्पॉट देखील केलं जातं. पण आता एका ट्रांसजेंडरच्या भेटीमुळे आराध्या – ऐश्वर्या चर्चेत आल्या आहेत. ट्रांसजेंडर सायेशा शिंदे हिने ऐश्वर्या – आराध्या यांच्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ट्रांसजेंडर सायेशा शिंदे आणि ऐश्वर्या – आराध्या यांच्या पहिल्या भेटीची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत प्रसिद्ध ट्रांसजेंडर फॅशन डिझायनर सायेशा शिंदे हिने आराध्या – ऐश्वर्या यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सायेशा म्हणाली, ‘माझ्या लिंग बदलाची बातमी कधीही न्यूजपेपरमध्ये आली नाही. काही ठराविक लोकांनाच माझ्या लिंग बदलाबद्दल माहिती होतं.’

पुढे सायेशा म्हणाली, ‘माझं सत्य इंडस्ट्रीमध्ये फार कमी लोकांना माहिती होतं. त्यामुळे फिटिंगसाठी जात असताना मी ऐश्वर्या हिच्या मॅनेजरला सांगितलं होतं, स्वप्नील हा नाही येणार नाही तर, सायेशा येणार आहे. ही गोष्ट मी ऐश्वर्या हिच्या मॅनेजरला सांगितली होती. कारण समोर आल्यानंतर कोणाल धक्का बसायला नको…’

हे सुद्धा वाचा

ऐश्वर्या हिच्याासोबत भेट झाल्यानंतर सायेशा म्हणाली, ‘ऐश्वर्या हिने मला आदर आणि सन्मान दिला. पूर्ण वेळ ऐश्वर्य मला फक्त सायेशा नावाने हाक मारत होती. एवढंच नाही तर, मुलगी आराध्या त्याठिकाणी आल्यानंतर ऐश्वर्या हिने आराध्यासोबत माझी ओळख सायेशा म्हणून करुन दिली…’

ऐश्वर्या हिने ज्याप्रमाणे स्वप्निल पासून सायेशा झालेल्या फॅशन डिझायनरला प्रेम दिलं, ते पाहून सायेशा प्रचंड भावुक झाली. सायेशा आजपर्यंत ऐश्वर्या आणि आराध्या यांच्यासोबत झालेली पहिली भेट विसरु शकलेली नाही. ऐश्वर्या हिच्यामध्ये हीच गोष्ट प्रचंड खास आहे… असं देखील सायेशा म्हणाली.

कोण आहे सायेशा शिंदे?

प्रसिद्ध फॅशन डिझायनर सायेशा शिंदे हिले अनेक जण स्वप्निल शिंदे म्हणून ओळखतात. सायेशा एक ट्रांसजेंडर महिला आहे. सायेशा हिने सामाजाची पर्वा न करता फक्त स्वतःच्या मनाचं ऐकलं आणि सायेशा शिंदे म्हणून स्वतःची ओळख निर्माणे केली. वयाच्या 30 व्या सायेशा हिने स्वतःचा स्वीकार ट्रांसजेंडर महिला म्हणून केला.

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....