शाहरुख खान याने कोरोना काळात अभिनेत्रीची अशी केली मदत, ‘ती’ खास पोस्ट शेअर करत म्हणाली…
या अभिनेत्रीमुळे शाहरुख खान पुन्हा चर्चेत, किंग खान याने अभिनेत्रीसाठी असं काय केलं, ज्यामुळे शाहरुख पुन्हा आला तुफान चर्चेत, तिने केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत...
Trial By Fire Actress On Shah Rukh Khan : अभिनेता शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून ‘पठाणा’ सिनेमामुळे चर्चेत आहे. शहरुख खान जितका मोठा अभिनेता आहे, तितकंच मोठं अभिनेत्याचं सामाजिक काम देखील आहे. नुकताच एका फिल्म पोर्टलने जानेवारी २०२३ च्या बेस्ट परफॉर्मरची यादी जाहिर केली आहे. ज्यामध्ये किंग खान याचं नाव देखील आहे. शिवाय या यादीमध्ये ट्रायल बाय फायर फेम अभिनेत्री राजश्री देशपांडे हिचं नाव देखील आहे. किंग खानसोबत एका लिस्टमध्ये नाव आल्यामुळे अभिनेत्री प्रचंड आनंदी आहे. अभिनेत्रीने स्वतःचा आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
किंग खानसोबत एकाच यादीमध्ये नाव आल्यामुळे राजश्री देशपांडे प्रचंड आनंदी आहे. राजश्री देशपांडे ट्विट करत म्हणाली, ‘शाहरुख खान याने कोरोना काळात त्याच्या NGO मीर फाउंडेशनच्या माध्यमातून मदत केली. अभिनेत्याने मराठवाडा, केरळ आणि छत्तीसगढ यांसारख्या राज्यांपर्यंत मदत पोहोचवली. @FilmCompanion ने आज दोघांच्या कामाला जानेवारी महिन्यातील बेस्ट परफॉर्मेंस घोषित केलं आहे.’
During covid @iamsrk helped me help Marathwada,Kerala &Chhattisgarh with his @MeerFoundation team.And today, @FilmCompanion mentions us together as the best performers of January! I don’t know when I’ll meet King Khan.But I’ll always dream of working with him! #mannatmaangli pic.twitter.com/xikI0HZ9Gr
— Rajshri Deshpande (@rajshriartist) February 2, 2023
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मला ठाऊक नाही, किंग खानसोबत भेट कधी होईल. शाहरुख खानसोबत काम करण्याची माझी इच्छा आहे.’ असं म्हणत राजश्रीने स्वतःच्या भावना व्यक्त केल्या. शिवाय शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ट्रायल बाय फायर सिनेमातील राजश्रीची भूमिका चाहत्यांना प्रचंड आवडली. सिनेमात राजश्री नीलम कृष्णमूर्ती यांच्या भूमिकेत दिसली. सिनेमात अभिनेत्रीच्या पतीची भूमिका अभिनेता अभय देओल याने साकारली होती. ट्रायल बाय फायर सिनेमातच नाही तर, द फेम गेम आणि सेक्रेड गेम्स यांसारख्या वेब सीरिजमध्ये देखील अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त आणि फक्त पठाण सिनेमाची चर्चा रंगत आहे. गेल्या नऊ दिवसांपासून सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. सिनेमाने प्रदर्शनानंतर नऊ दिवसांत ७०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. आता शनिवार – रविवार असल्यामुळे सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाचं शाहरुख खान याने मोठ्या पडद्यावर चार वर्षांनंतर पुन्हा पदार्पण केल्यामुळे अभिनेत्याला पाहण्यासाठी अनेक चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने ‘बेशर्म रंग’ गाण्यामध्ये घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण कोणत्याही वादाचा बॉक्स ऑफिसवर कोणताही परिणाम झाला नाही.