आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या व्यक्तीला अभिनेत्री म्हणाली, ‘माणसाच्या स्वभावातच…’
Derogatory Comments | 'बेडरुममध्ये मला तुझ्यासोबत...', आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या व्यक्तीबद्दल अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य... संबंधीत प्रकरण कायद्याच्या कचाट्यात अडकल्यानंतर अभिनेत्याने मागितली माफी... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...
मुंबई | 25 नोव्हेंबर 2023 : झगमगत्या विश्वातील वादग्रस्त घटना कायम चाहत्यासमोर येत असतात. आता देखील एक महत्त्वाची गोष्ट समोर आहे. गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सिनेविश्वातील अभिनेता मन्सून अली खान याने काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तृषा कृषन हिच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. ज्यामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला. मन्सूर अली खान याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर अभिनेत्याने तृषा हिची माफी मागितली. त्याआधी अभिनेता माफी मागण्यासाठी तयार नव्हता… मन्सूर अली खान याने माफी मागितल्यानंतर अभिनेत्रीने देखील प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृषा हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
प्रकरण कायद्याच्या कचाट्यात पोहोचल्यानंतक मन्सूर अली खान याने अभिनेत्रीची माफी मागितली. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मन्सूर याने लिहिलं, ‘माझी सह-कलाकार तृषा, मला माफ कर. देवाने मला ही संधी द्यावी की मी तुझ्या लग्नात तुला आशीर्वाद देऊ शकू. ’ मंसूरच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
अभिनेत्याने माफी मागितल्यानंतर तृषा हिने देखील एक्सवर (ट्विटर) पोस्ट केली आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘चुका करणं माणसाच्या स्वभावात आहे आणि क्षमा करणं देवांचे गुण आहेत…’ सध्या सर्वत्र तृषा हिची पोस्ट व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, अंतरिम जामिनाच्या याचिकेला फेटाळल्यानंतर अभिनेत्याचे सूर बदलले आहेत आणि त्याने तृषा हिची माफी मागितली.
काय आहे प्रकरण?
मन्सूर अली खानला तृषासोबत ‘लिओ’ सिनेमात एक सीन करायचा होता. याविषयी तो म्हणाला, “जेव्हा मला समजलं की तृषासोबत मला एक सीन शूट करायचा आहे, तेव्हा मी विचार केला की एखादा बेडरुम सीन असेल. तिला मी बेडरुममध्ये घेवून जाईल. याआधी देखील मी अनेक बलात्काराचे अनेक सीन्स शूट केले आहेत. पण यावेळी असं काहीही झालं नाही. मला तृषा हिचा चेहरा देखील पाहता आला नाही…
अभिनेत्याच्या वक्तव्यानंतर अभिनेत्रीसह अनेकांनी संताप व्यक्त केला. मेगास्टार चिरंजीवी, लोकेश कनागराज आणि इतर अनेकांनी मन्सूर याच्या वक्तव्यावर टीका केली. एवढंच नाही तर, मन्सूर अली खान याच्यासोबत पुढे कधीच स्क्रिन शेअर करणार नाही… असं वक्तव्य अभिनेत्री तृषा हिने केलं आहे. पण अभिनेत्याने माफी मागितल्यानंतर प्रकरण शमलं आहे.