Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trupti Dimri: रणबीर कपूरसोबत इंटिमेट सीन करणाऱ्या तृप्ती डिमरीला मिळाले इतके पैसे

Tripti Dimri Fees For Animal: तृप्ती डिमरी ही 'Animal' मधील तिच्या इंटिमेट सीन्समुळे चर्चेत आहे. अशा परिस्थितीत आता या चित्रपटासाठी तिने किती फी घेतली हे समोर आले आहे. यामध्ये ती फक्त काही सीनमध्येच दिसली पण तिने त्यातून मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. पण या सिनेमासाठी तिला खूपच कमी पैसे मिळाले आहेत.

Trupti Dimri: रणबीर कपूरसोबत इंटिमेट सीन करणाऱ्या तृप्ती डिमरीला मिळाले इतके पैसे
tripti dimri intimate scene
Follow us
| Updated on: Dec 15, 2023 | 2:46 PM

Trupti Dimri fees : रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्या अ‍ॅनिमल या चित्रपटातील काही मिनिटांच्या इंटिमेट सीनमुळे तृप्ती डिमरी चांगलीच चर्चेत आली आहे. ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर कपूरसोबतच्या तिच्या इंटिमेट सीनची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. पण या चित्रपटासाठी तृप्ती डिमरीने किती फी घेतली आहे हे तुम्हाला माहिती आहे का? ते कळले तर चाहते नक्कीच म्हणतील की हे खूप कमी आहे.

अॅनिमलच्या इतर कलाकारांच्या फीबद्दल बोलायचे झाल्यास, मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूडमध्ये एक मोठे नाव बनलेल्या रणबीरने या चित्रपटासाठी सुमारे 70 कोटी रुपये घेतले आहेत. तर रणबीर कपूरच्या ऑनस्क्रिन पत्नीची भूमिका साकारणाऱ्या रश्मिका मंदान्नाला जवळपास 4 कोटी रुपये मिळाले आहेत. तर खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या बॉबी देओलला 4 कोटी रुपये फी देण्यात आली होती. तर अनिल कपूरने फी म्हणून 2 कोटी रुपये घेतले. तृप्ती डिमरी हिने सर्वात कमी फी घेतली आहे आणि त्याचीच सर्वाधिक चर्चा होत आहे. तिला या सिनेमासाठी फक्त 40 लाख रुपये मिळाले आहेत.

विशेष म्हणजे पोस्टर बॉईजमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी तृप्ती डिमरी ‘अ‍ॅनिमल’ नंतर आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.

तृप्ती डिमरी हिने ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली होती. आता ‘अ‍ॅनिमल’ केल्यानंतर तिचा IMDB च्या ‘पॉप्युलर इंडियन सेलिब्रिटीज’च्या यादीत समावेश झाला आहे. ‘अ‍ॅनिमल’पूर्वी तिने ‘लैला मजनू’ सारख्या चित्रपटात काम केले आहे. मात्र, यामुळे तिला फारशी ओळख मिळाली नाही.

‘अ‍ॅनिमल’ हा तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला आहे, ज्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.