न हसता व्हिडीओ बघून दाखवाच.. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमचं नेटकऱ्यांना ओपन चॅलेंज

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील कलाकारांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओसह त्यांनी नेटकऱ्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. न हसता हा व्हिडीओ बघा, असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

न हसता व्हिडीओ बघून दाखवाच.. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमचं नेटकऱ्यांना ओपन चॅलेंज
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीमImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 12, 2024 | 11:53 AM

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात या शोचे असंख्य चाहते आहेत. हास्यजत्रेतील कलाकार सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. शूटिंगमधून त्यांना जेव्हा थोडा मोकळा वेळ मिळतो, तेव्हा ते चाहत्यांसाठी आवर्जून मजेशीर व्हिडीओ शूट करतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. असाच एक त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हास्यजत्रेचे कलाकार नुकतेच एकत्र जमले होते. त्यावेळी त्यांनी हा व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी तो न हसता बघण्याचं आव्हान नेटकऱ्यांना दिलं आहे. त्यावर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर सतत विविध ट्रेंड्स येत असतात. गेल्या काही दिवसांत असाच एक ट्रेंड चर्चेत होता, तो म्हणजे गायक कैलाश खेर यांच्या ‘सैय्यां’ या गाण्याचा सुरुवातीचा आलाप गाऊन दाखवणं. मित्र-मैत्रिणींच्या, ऑफिसमधल्या सहकाऱ्यांच्या, ट्रेनमधल्या प्रवासांच्या विविध ग्रुप्सने हा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. मग यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोचे कलाकार तरी कसे मागे राहतील? त्यांनीसुद्धा हा व्हिडीओ शूट केला आहे. ‘न हसता व्हिडीओ बघा..’ असं कॅप्शन देत निखिल बनेनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Nikhil Bane (@banenikhil)

प्रसाद खांडेकर, निखिल बने, वनिता खरा, नम्रता संभेराव, रसिका वेंगुर्लेकर, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, इशा डे, चेतना भट्ट, प्रियदर्शिनी इंदलकर यांसारख्या कलाकारांनी मिळून ‘सैय्यां’ या गाण्याचा सुरुवातीचा आलाप आपापल्या अंदाजाने गाण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र प्रत्येकाचा अंदाज इतका विनोदी आहे की हा व्हिडीओ पाहताना तुम्हाला आपसूकच हसू येईल. ‘हसल्याशिवाय राहणार नाही’, अशी कमेंट एका युजरने केली. तर ‘पोट धरून हसलो’ असं दुसऱ्याने म्हटलंय. अनेकांनी या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाले आहेत.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.