प्रेम करुन कात्रीत सापडलेल्या अर्णव-ईश्वरीची हटके लव्हस्टोरी; ‘तू ही रे माझा मितवा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये शर्वरी जोग आणि अभिजीत आमकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रेम करुन कात्रीत सापडलेल्या अर्णव-ईश्वरीची ही हटके लव्हस्टोरी आहे.

प्रेम करुन कात्रीत सापडलेल्या अर्णव-ईश्वरीची हटके लव्हस्टोरी; 'तू ही रे माझा मितवा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
शर्वरी जोग, अभिजीत आमकरImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 2:53 PM

प्रेम कुणाचे नाही कुणावर… प्रेम असे आभासच केवळ प्रेम असावी एक कल्पना… प्रेम मनातील व्यर्थ भावना सोडूनी अर्ध्यावर जाते कोणी कुणा…आठवांच्या उरती छळणाऱ्या खुणा तरी ही चाहूल गोड कुणाची जिवाला ओढ लावी का नाव कुणाचे घेता ही रात दरवळून यावी ह्या मनात रुजलेला कोणाचा गोडवा… तू ही रे माझा मितवा…

लेखिका रोहिणी निनावे यांनी लिहिलेलं हे शीर्षकगीत अर्णव आणि ईश्वरीच्या प्रेमाची गोष्ट सांगून जातं. या दोघांची प्रेम कहाणी थोडी हटके आहे. एकमेकांच्या प्रेमात ते जितके बुडाले आहेत तितकेच ते एकमेकांचा तिरस्कारही करतात. म्तहटलं तर एकमेकांशिवाय जगता येत नाही आणि म्हटलं तर एकमेकांसोबत राहताही येत नाही. थोडक्यात प्रेम करुन कात्रीत सापडलेल्या अर्णव आणि ईश्वरीची हटके लव्हस्टोरी म्हणजे ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका. ‘कुन्या राजाची गं तू रानी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली गुंजा म्हणजेच अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिनेता अभिजीत आमकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, “तू ही रे माझा मितवा ही एक युवा प्रेम कहाणी आहे. या मालिकेतून परस्पर नातेसंबंध उलगडतीलच पण या दोन प्रमुख पात्रांध्ये एक नवी केमिस्ट्री पाहायला मिळेल. प्रेम आहे पण व्यक्त होता येत नाही, राग आहे पण प्रेमामुळे रोखून ठेवलंय अशी ही दोन विरुद्ध माणसांची प्रेम कहाणी फुलत जाईल जी रसिकांना नक्की आवडेल.”

स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती महेश तागडे आणि जितेंद्र गुप्ता यांच्या टेल अ टेल मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या निर्मिती संस्थेने केली आहे. शैलेश शिर्सेकर या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. ‘तू ही रे माझा मितवा’ ही नवी मालिका येत्या 23 डिसेंबरपासून रात्री 10.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.