Tu Jhoothi Main Makkaar Box Office Collection Day 4 : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर स्टारर ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. ८ मार्च रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालेला सिनेमा आता बॉक्स ऑफिसवर नवीन विक्रम रचताना दिसत आहे. दिग्दर्शक लव रंजन दिग्दर्शित ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाने चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाचा बोलबाला दिसत आहे. सध्या सर्वत्र ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाची चर्चा आहे. सिनेमाला विश्लेषक आणि प्रेक्षकांकडून हिरवा सिग्नल मिळाला आहे.
शविवारी बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारल्यानंतर रविवारी देखील सिनेमा उत्तम कामाई करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रविवारी सिनेमाने चांगली कमाई केली तर सिनेमा जवळपास ६० कोटी रुपयांचा गल्ला जमा करेल असं सांगण्यात येत आहे. ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी १५.७३ कोटी रुपये जमा केले.
तर दुसऱ्या दिवशी सिनेमाने जवळपास १०.३४ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. तिसऱ्या दिवशी सिनेमाने १०.५२ कोटी पर्यंच मजल मारली. अशाप्रकारे सिनेमाने तीन दिवसांत ३६ कोटी रुपयांचा गल्ला पार केला. तर चौथ्या दिवशी सिनेमाने जवळपास १३ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. चार दिवसांत ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाने जवळपास ४५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
आता येणाऱ्या दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शक लव रंजन रोमांटिक सिनेमांसाठी ओळखले जातात. त्यांनी अभिनेता कार्तिक याच्या करियरला चांगलं वळण दिलं आहे. ‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ सिनेमामुळे कार्तिकची लोकप्रियता देखील प्रचंड वाढली. ‘तू झूठी, मैं मक्कार’ सिनेमात रणबीर मुख्य भूमिकेत आहे, पण कार्तिक आर्यन याच्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेला अधिक प्रेम मिळेत आहे.
‘तू झूठी, मैं मक्कार’ सिनेमात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत डिंपल कपाडिया, बोनी कपूर, हसलीन कौर, राजेस जैस, आयशा राजा मिश्रा या सेलिब्रिटींची देखील महत्त्वाची भूमिका आहे. ‘तू झूठी, मैं मक्कार’ सिनेमानंतर रणबीर नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हिच्यासोबत ‘एनिमल’ सिनेमात दिसणार आहे. त्यामुळे रणबीर आणि रश्मिका यांची रिल लाईफ जोडी प्रेक्षकांना आवडते का? हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.