TJMM | ‘तू झूठी मैं मक्कार’च्या सहाव्या दिवसाच्या कमाईत मोठी घसरण; जाणून घ्या किती झाली कमाई?

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळतोय. प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत बरीच घसरण झाल्याचं पहायला मिळतंय.

TJMM | 'तू झूठी मैं मक्कार'च्या सहाव्या दिवसाच्या कमाईत मोठी घसरण; जाणून घ्या किती झाली कमाई?
Tu Jhoothi Main Makkar Image Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jan 06, 2025 | 3:27 PM

मुंबई : शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याआधी आणि त्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेले बरेच बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. नुकताच रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहेत. पहिल्या पाच दिवसांत बॉक्स ऑफिसवर त्याची चांगली कमाई झाली. कमाईचा हा आकडा 70 कोटी रुपयांहून अधिक झाला. मात्र सहाव्या दिवशी (सोमवारी) कमाईत घसरण पहायला मिळाली.

‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी 6.03 कोटी रुपये कमावले आहेत. सोमवारी चित्रपटाच्या कमाईत जवळपास 60 टक्क्यांहून अधिक घट झाली. पहिल्याच दिवशी रणबीर-श्रद्धाच्या या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाने 15 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता.

हे सुद्धा वाचा

तू झूठी मैं मक्कारची आतापर्यंतची कमाई

बुधवार- 15.73 कोटी रुपये

गुरुवार- 10.34 कोटी रुपये

शुक्रवार- 10.52 कोटी रुपये

शनिवार- 16.57 कोटी रुपये

रविवार 17.08 कोटी रुपये

सोमवार 6.05 कोटी रुपये

एकूण- 76.29 कोटी रुपये

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने सोमवारी नॅशनल चेन्समधून 3.03 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. यामध्ये पीव्हीआरमधून 1.41 कोटी रुपये, आयनॉक्समधून 98 लाख रुपये आणि सिनेपोलीसमधून 64 लाख रुपयांची कमाई झाली.

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र झळकले आहेत. ‘पठाण’नंतर ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाने केलेली कमाई चांगली मानली जात आहे. या आठवड्यात हा चित्रपट 100 कोटी रुपयांच्या क्लबमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चित्रपटात रणबीर आणि श्रद्धासोबतच डिंपल कपाडिया, बोनी कपूर, अनुभव सिंह बस्सी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मध्यांतरानंतर चित्रपटातील एंटरटेन्मेंटचा डोस डबल होतो. यामध्ये कार्तिक आर्यन आणि नुशरत भरूचा यांची खास एण्ट्रीसुद्धा पहायला मिळते. हा एक परफेक्ट लव रंजन चित्रपट आहे. खळखळून हसवतानाच हा चित्रपट तुम्हाला कधी भावूक करेल, हे कळणार नाही. मोनोलॉग आणि इतर संवाद यांमुळे कथा आणखी मजबूत वाटते. या चित्रपटाचा क्लायमॅक्स सर्वांत मजेशीर आहे.

बऱ्याच काळानंतर बॉलिवूडमध्ये असा रोमँटिक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. जवळपास 200 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट 8 मार्च रोजी देशभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.