Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्याच चित्रपटातून रातोरात झाली प्रसिद्ध; लक्षाधीश उद्योजकाशी लग्न केल्यानंतर सोडली इंडस्ट्री

001 मध्ये तिने अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'तुम बिन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात सर्व नवोदित कलाकार होते, तरीसुद्धा बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आणि त्यातील गाणी तुफान गाजली. 'तुम बिन' चित्रपटामुळे संदलीला रातोरात प्रसिद्धी मिळाली.

पहिल्याच चित्रपटातून रातोरात झाली प्रसिद्ध; लक्षाधीश उद्योजकाशी लग्न केल्यानंतर सोडली इंडस्ट्री
Sandali SinhaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 3:49 PM

मुंबई | 25 जुलै 2023 : बॉलिवूड इंडस्ट्रीत असे फार कमी कलाकार असतात ज्यांना करिअरमधील पहिल्याच चित्रपटातून भरपूर प्रसिद्धी मिळते. पदार्पणातील चित्रपटातून घराघरात पोहोचल्यानंतर पुढे त्या कलाकाराचं इंडस्ट्रीतील करिअर फार यशस्वी असल्याचं मानलं जातं किंवा अशा कलाकारांसाठी पुढील मार्ग इतरांच्या तुलनेत सोपा असतो. त्यामुळे बॉलिवूडमध्ये यशस्वी करिअर असलेला असा एखादा कलाकार जेव्हा अवघ्या काही चित्रपटांनंतर इंडस्ट्री सोडतो तेव्हा चाहत्यांसाठी ते फार आश्चर्यकारक असतं. असंच काहीसं अभिनेत्री संदली सिन्हासोबत घडलं. इंडस्ट्रीत फक्त सहा वर्षे काम केल्यानंतर संदलीने कलाविश्वाला कायमचा रामराम केला.

संदली सिन्हाचं करिअर आणि यश

संदलीचा जन्म बिहारमध्ये झाला असून वडिलांच्या निधनानंतर ती दिल्लीला शिक्षणासाठी आली. दिल्लीत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर करिअरसाठी मुंबईला आली. नव्वदच्या दशकात सोनू निगमच्या ‘दिवाना’ या म्युझिक व्हिडीओमध्ये तिला पहिली संधी मिळाली. त्यानंतर तिने ‘मुस्कान’ आणि ‘तन्हा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. 2001 मध्ये तिने अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘तुम बिन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात सर्व नवोदित कलाकार होते, तरीसुद्धा बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आणि त्यातील गाणी तुफान गाजली. ‘तुम बिन’ चित्रपटामुळे संदलीला रातोरात प्रसिद्धी मिळाली.

संदलीचा इंडस्ट्रीला रामराम

‘तुम बिन’ या चित्रपटाच्या यशानंतर संदलीने समिक्षकांकडून पसंती मिळालेल्या ‘पिंजर’सारख्या चित्रपटात भूमिका साकारली. त्यानंतर मल्टीस्टारर ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’ या चित्रपटात ती झळकली. 2005 मध्ये तिने तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ‘ओरे पांडू’ या तेलुगू चित्रपटानंतर संदलीला फारसं यश मिळालं नाही. त्यामुळे तिला ऑफर्स मिळणंही कमी झालं. 2005 याच वर्षी संदलीने लग्न केलं आणि त्यानंतर तिने इंडस्ट्रीला कायमचा रामराम केला. 2007 मध्ये प्रदर्शित झालेला ‘मै रॉनी और जॉनी’ या चित्रपटात ती शेवटची झळकली. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुम बिन 2’ या चित्रपटात तिने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली.

हे सुद्धा वाचा

संदली सिन्हाचा पती

2005 मध्ये संदलीने उद्योजक किरण साळसकरशी लग्नगाठ बांधली. या दोघांना दोन मुलं आहेत. किरण हे ‘कंट्री ऑफ ओरिजिन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि IEHPL चे संस्थापक आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती ही सुमारे 150 कोटी रुपये आहे.

विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.