वाढदिवासाआधी अभिनेत्रीची आत्महत्या; तिचं सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

| Updated on: Jan 04, 2023 | 10:49 AM

कुटुंब, मित्र परिवार करत होते अभिनेत्रीच्या वाढदिवसाची तयारी; पण आभिनेत्रीने संपवलं स्वतःचं जीवन

वाढदिवासाआधी अभिनेत्रीची आत्महत्या; तिचं सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
वाढदिवासाआधी अभिनेत्रीची आत्महत्या; तिचं सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
Follow us on

Tunisha Sharma Birthday: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने गळफास घेत आत्महत्या केली. २४ डिसेंबर २०२२ मध्ये अभिनेत्रीने बॉयफ्रेंडच्या मेकअप रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. वर्षाच्या शेवटी तुनिशाने आत्महत्या केल्यामुळे कुटुंबाला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. दरम्यान, वाढदिवसाची तयारी सुरु असताना अभिनेत्रीने गाळफास घेतल्यामुळे कुटुंब, मित्र परिवारावर दुःखाचं डोंगर कोसळला आहे.

वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी अभिनेत्रीने गळफास घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. आज जर तुनिशा जिवंत असती, तर स्वतःचा २१ वा वाढदिवस साजरा करत असती. सध्या तुनिशाचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.

‘आलीबाबा’ मालिकेत मुख्य अभिनेत्रीने गळफास घेवून आत्महत्या केल्यामुळे एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता शिझान खानला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिनेत्रीने आत्महत्या का केली? हे रहस्य अद्याप समोर आलेलं नाही. तुनिशाच्या आत्महत्येनंतर शिझानच्या अडचणीत वाढ झाली आहे.

तुनिशाने फक्त मालिकांमध्येच नाही, तर अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. यशाच्या शिखरावर चढत असताना तुनिशाने घेतलेला टोकाचा निर्णय हैराण करणारा आहे.

झगमगत्या विश्वात तुनिशाने स्वतःची वेगळी जागा निर्माण केली होती. गेल्या वर्षी ४ जानेवारीला अभिनेत्रीने चंदीगड याठिकाणी वाढदिवस साजरा केला होता. आज तुनिशा जगात नसल्यामुळे तिच्या जुन्या आठवणींनी चाहते, कुटुंब आणि मित्र परिवार दुःखात आहेत.

तुनिशाच्या आत्महत्येनंतर रोज याप्रकरणात नवे खुलासे समोर येत आहेत. म्हणून अभिनेत्रीच्या आत्महत्या प्रकरणात पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.