Tunisha Case: तुनिशाच्या आत्महत्येप्रकरणी मित्राची भावूक पोस्ट; ‘फक्त एक कॉल केला असता तर..’

तुनिशाच्या सुख-दुःखात साथ देणाऱ्या 'त्या' मित्राची पोस्ट व्हायरल; अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर पूर्णपणे खचला!

Tunisha Case: तुनिशाच्या आत्महत्येप्रकरणी मित्राची भावूक पोस्ट; 'फक्त एक कॉल केला असता तर..'
Tunisha SharmaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 27, 2022 | 7:48 AM

मुंबई: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या जवळच्या मित्राने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेच्या सेटवर तिने आत्महत्या केली. तिच्या पार्थिवावर आज (मंगळवार) अंत्यसंस्कार होणार आहेत. तुनिशाच्या प्रत्येक सुख-दु:खात देणारा खास मित्र कंवर ढिल्लन याने इन्स्टाग्रामवर तिच्यासाठी भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. ‘फक्त एक कॉल केला असता तर..’ अशी खंत त्याने या पोस्टमधून व्यक्त केली.

कंवर ढिल्लनची पोस्ट-

‘प्रिय तुनिशा, तू अशी आम्हाला सोडून गेल्याने मी तुझ्यावर नाराज आहे. फक्त एक कॉल केला असता तर.. फक्त एक कॉल. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी तुझ्यासोबत होतो. आपण ही लढाईसुद्धा जिंकली असती. इतकी प्रेमळ आई आणि यशस्वी करिअर सोडून तू इतक्या कमी वयात आम्हाला सोडून गेलीस, यावर विश्वासच बसत नाही. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी तू खूप मेहनत केलीस आणि ते सर्व असंच सोडून गेलीस’, असा भावूक सवाल त्याने केला.

हे सुद्धा वाचा

‘तुझ्यासोबतच्या कित्येक आठवणी मी कसं विसरू? पहिल्या लॉकडाऊनमध्ये तीन महिने तू आमच्यासोबत राहिलीस आणि नंतर चंदीगडला गेलीस. तुझी तब्येत, तुझा संघर्ष, तुझी पहिली कार या सगळ्यात मी तुझ्यासोबत होतो. मी नेहमीच तुला पाठिंबा दिला. आता हॉस्पिटलमध्ये तुला असं पाहिल्यानंतर मी पूर्णपणे खचलोय. तुला ॲम्ब्युलन्समध्ये न्यायला खूप हिम्मत लागली, पण मलाच घेऊन जायचं होतं’, अशा शब्दांत कंवरने भावना व्यक्त केल्या.

‘कानू, ऐक यार, माझी एकदा मदत कर प्लीज, असं एकदा म्हणाली असतीस तर मी धावत आलो असतो’, असं त्याने या पोस्टच्या अखेरीस लिहिलं आहे. कंवरच्या या पोस्टवर अनेक टीव्ही कलाकारांनी कमेंट्स करत सहवेदना व्यक्त केल्या आहेत. तुनिशाच्या पार्थिवावर आज (मंगळवार) दुपारी 3 वाजता मिरा रोड इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.