Tunisha Case: महिला पोलिसांसमोर ढसाढसा रडला शिझान; तुनिशाच्या आत्महत्येप्रकरणी कसून चौकशी सुरू

तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी एक्स-बॉयफ्रेंड झिशानची 3 दिवसांपासून चौकशी; पोलिसांसमोर अभिनेत्याला कोसळलं रडू

Tunisha Case: महिला पोलिसांसमोर ढसाढसा रडला शिझान; तुनिशाच्या आत्महत्येप्रकरणी कसून चौकशी सुरू
Sheezan KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 27, 2022 | 1:03 PM

मुंबई: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी तिचा एक्स-बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिझान खानला पोलिसांनी अटक केली. तुनिशाच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजावं, यासाठी पोलीस प्रत्येक गोष्टीची पडताळणी करून तपास करत आहेत. या चौकशीदरम्यान काही खुलासेसुद्धा होत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिला अधिकारीसमोर जेव्हा शिझानची चौकशी होत होती, तेव्हा तो ढसाढसा रडला. पोलीस चौकशीदरम्यान तो खूपच कमी बोलत आहे आणि इतर मुलींसोबतच्या नात्याला नकार देतोय, असंही कळतंय.

पोलिसांनी संपूर्ण क्राइम सीनची व्हिडीओग्राफी केली आहे आणि शिझानचा जबाब लेखी तसंच व्हिडीओच्या स्वरुपातही रेकॉर्ड केला आहे. वसई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुनिशा आणि झिशान फक्त तीन महिने रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांच्या नात्याची आणि ब्रेकअपची माहिती तुनिशा आणि शिझानच्या कुटुंबीयांनाही होती.

हे सुद्धा वाचा

तपासात असंही समोर येतंय की शिझानने दिल्लीत झालेल्या श्रद्धा हत्याकांडानंतर तुनिशाशी ब्रेकअप केलं होतं. मात्र याबद्दल अद्याप स्पष्ट काही सांगू शकत नाही, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. शिझान आणि तुनिशाने श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर ब्रेकअपचा निर्णय घेतला, असं म्हटलं जातंय.

21 वर्षीय तुनिशा ही अली बाबा: दास्तान-ए-काबुल या मालिकेत काम करत होती. 24 डिसेंबर रोजी ती नेहमीप्रमाणे शूटिंगसाठी गेली होती. दुपारी 3 वाजता ती शिझानच्या रुममधील वॉशरुममध्ये गेली आणि तासाभरानंतर ती तिथे लटकलेल्या अवस्थेत आढळली, असं पोलीस म्हणाले. जे. जे. रुग्णालयाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, तुनिशाचा मृत्यू गळा आवळल्याने झाला.

तुनिशाला लग्नाचं आमिष दाखवून तिची फसवणूक केली, असा आरोप तिच्या आईने केला. आईच्या तक्रारीनंतर अभिनेता शिझान खानला रविवारी अटक झाली.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.