Tunisha Sharma: तुनिशाच्या आत्महत्येनंतर सेटवर भीतीचं वातावरण; FWICE च्या अध्यक्षांनी उचललं मोठं पाऊल

"मेकअप रुमची जागा छोटी, सेटवर इतके लोक तरीही.."; तुनिशाच्या आत्महत्येप्रकरणी FWICE च्या अध्यक्षांनी उपस्थित केले प्रश्न

Tunisha Sharma: तुनिशाच्या आत्महत्येनंतर सेटवर भीतीचं वातावरण; FWICE च्या अध्यक्षांनी उचललं मोठं पाऊल
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 28, 2022 | 9:11 AM

मुंबई: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने आत्महत्या करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. मंगळवारी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पडले. तुनिशाने तिच्या मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर सेलिब्रिटींमध्ये आणि कलाविश्वात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आता FWICE ने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

काय म्हणाले FWICE चे अध्यक्ष?

तुनिशाच्या आत्महत्येनंतर FWICE (फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिनेइंप्लाई) चे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी महत्वाचे प्रश्न उपस्थित केले. एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडल्याचं त्यांनी म्हटलंय. “या घटनेमुळे एका चुकीच्या प्रचलनाची सुरुवात झाली आहे. अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी गंभीरतेनं विचार करण्याची आणि त्यानुसार निर्णय घेण्याची गरज आहे,” असं तिवारी म्हणाले.

“भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी फेडरेशनने निर्मात्यांना पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्या मालिकेचा विचार केला तर अभिनेत्रीने आत्महत्या केली, अभिनेता अटकेत आहे, अत्यंत महागडा सेट उभारला असूनही आता शूटिंग होऊ शकत नाही. आतापर्यंतचा हा सर्वांत महागडा सेट आहे. अशाच निर्मात्यांची परिस्थिती काय असेल? यावर विचार करण्याची गरज आहे”, असं ते पुढे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

तुनिशाच्या आत्महत्येवर उपस्थित केले प्रश्न

तुनिशाच्या आत्महत्येवर बी. एन. तिवारी यांनी काही महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले. “मेकअप रुममध्ये इतकी जागा नसते की कोणी तिथे आत्महत्या करू शकेल. सेटवर इतके लोक उपस्थित होते, त्यांना तुनिशाच्या आत्महत्येविषयी कळलं कसं नाही. लोकांना आता एकमेकांची काळजीच नाही. आम्ही निर्मात्यांची बैठक घेऊन याविषयी चर्चा करणार आहोत. फक्त पैसा कमावणं हेच त्यांचं लक्ष्य असू शकत नाही. त्यांना त्यांच्या टीममधील सदस्यांच्या मानसिक स्थितीची माहिती असायला हवी”, असं म्हणत असतानाच त्यांनी काही उपाय सुचवले.

“मी टू मोहिमेदरम्यान आम्ही एक टीम बनवली होती. यावेळी आम्ही हा मुद्दा मांडणार आहोत की प्रत्येक मालिकेच्या, शोच्या सेटवर काऊन्सलर असावेत. प्रत्येक काऊन्सलरला कलाकारांच्या मेडिकल रिपोर्टची माहिती असावी. शूटिंगचं वेळापत्रक आणि मानसिक ताण यांबद्दल काऊन्सलरने जागरुक रहावं. तुनिशाच्या आत्महत्येनं सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे”, असं बी. एन. तिवारी म्हणाले.

तुनिशा ज्या मालिकेत काम करत होती, त्या मालिकेतील इतर कलाकार आणि क्रू मेंबर्स यांच्या रोजगाराविषयीचे प्रश्नही सोडवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.