Tunisha Sharma: तुनिशाच्या डिप्रेशनबाबत पोलिसांचा मोठा खुलासा; औषधांबद्दलचं सत्य आलं समोर

तुनिशाच्या डिप्रेशनबाबत पोलिसांची महत्त्वपूर्ण माहिती; जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले?

Tunisha Sharma: तुनिशाच्या डिप्रेशनबाबत पोलिसांचा मोठा खुलासा; औषधांबद्दलचं सत्य आलं समोर
Tunisha Sharma
Follow us
| Updated on: Dec 27, 2022 | 11:24 AM

मुंबई: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने 24 डिसेंबर रोजी वसईत मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. तुनिशाच्या मृत्यूच्या निधनाने टेलिव्हिजन विश्वात शोककळा पसरली आहे. तिच्या आत्महत्येप्रकरणी एक्स बॉयफ्रेंड शिझान खानला मुंबई पोलिसांनी अटक केली. शिझानसोबतच्या ब्रेकअपनंतर तिने टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे तर गेल्या काही महिन्यांपासून ती डिप्रेशनसंबंधित औषधं घेत होती, असं म्हटलं गेलं. या प्रकरणी आता पोलिसांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.

तुनिशाला लग्नाचं आमिष दाखवून तिची फसवणूक केली, असा आरोप तिच्या आईने केला. आईच्या तक्रारीनंतर अभिनेता शिझान खानला रविवारी अटक झाली. अली बाबा: दास्तान-ए-काबुल या मालिकेत दोघं एकत्र काम करत होते. तुनिशा आणि शिझान हे जवळपास तीन महिने रिलेशनशिपमध्ये होते. मात्र तो फसवणूक करत असल्याचं कळताच दोन आठवड्यांपूर्वी तुनिशाने ब्रेकअप केलं, असा आरोप तिच्या आईने केला.

तुनिशा आणि शिझानच्या कुटुंबीयांना दोघांच्या रिलेशनशिप आणि ब्रेकअपविषयीची माहिती होती, असं पोलिसांनी सांगितल. मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर हे दोघं बाहेर फिरायलाही एकत्र गेले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हे सुद्धा वाचा

नऊ जणांचे जबाब नोंदवले

सहकलाकार, स्टाफ यांच्यासह एकूण नऊ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले. 24 डिसेंबर रोजी ती नेहमीप्रमाणे शूटिंगसाठी गेली होती. दुपारी 3 वाजता ती शिझानच्या रुममधील वॉशरुममध्ये गेली आणि तासाभरानंतर ती तिथे लटकलेल्या अवस्थेत आढळली, असं पोलीस म्हणाले. जे. जे. रुग्णालयाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, तुनिशाचा मृत्यू गळा आवळल्याने झाला.

तुनिशा डिप्रेशनसाठी कुठलीही औषधं घेत नव्हती, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं. 2018 च्या आधी तुनिशाने नैराश्याचा सामना केला होता. त्यावेळी औषधं घेत असल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

वडिलांच्या निधनानंतर फार कमी वयात तुनिशाला काम करावं लागलं होतं. वडिलांनंतर तिने चुलत बहीण आणि आजीलाही गमावलं. या सगळ्यांमुळे ती भावनिकदृष्ट्या खचली होतं. “त्यावेळी मी नैराश्यात असल्याचं निदान झालं होतं. जेव्हा मी औषधं घ्यायला सुरुवात केली, तेव्हा मी जणू झॉम्बीच झाले होते. मला कामावर जायचाही राग यायचा. सोशल मीडियाचाही माझ्यावर परिणाम होऊ लागला”, असं ती जुन्या मुलाखतीत म्हणाली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.