‘गळफास घेतल्यानंतर तात्काळ शिझान तुनिशाला वाचवू शकत होता, पण…’, अभिनेत्रीच्या आईचा धक्कादायक दावा
'गळफास घेतल्यानंतर तुनिशा जिवंत होती, पण शिझानने...' अभिनेत्रीच्या आईच्या धक्कादायक दाव्यानंतर सर्वत्र खळबळ
मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने २४ डिसेंबर २०२२ रोजी अभिनेता आणि एक्स बॉयफ्रेंड शिझान खानच्या मेकअप रुममध्ये आत्महत्या केली. लेकीच्या आत्महत्येनंतर तुनिषाच्या आईने शिझानवर गंभीर आरोप केले. ज्यामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी शिझानला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान तुनिशाच्या आईने पुन्हा शिझानवर गंभीर आरोप केले आहे. गळफास घेतल्यानंतर तात्काळ शिझान तुनिशाला वाचवू शकत होता, पण त्याने तसं केलं नसल्याचा आरोप तुनिशाच्या आईने शिझानवर केला आहे. तुनिशा शर्माच्या आईने केलेल्या दाव्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
तुनिशाच्या आई म्हणाल्या, ‘ही हत्या होवू शकते… तुनिषाने गळफास लावल्याचं कळालं तेव्हा ती श्वास घेत होती. जर शिझानने सेटपासून जवळ असलेल्या रुग्णालयात तिला दाखल केलं असतं, तर तिचे प्राण वाचू शकले असते. सेटपासून ५ अंतरावर हॉस्पिटल्स होती. तो त्या रुग्णालयात तिला का घेवून गेला नाही? ती श्वास घेत होती, तिला वाचवता आलं असतं..’ असा दावा तुनिशाच्या आईने केला आहे.
शिझानला दिलासा नाहीच… तुनिशा शर्माने वयाच्या २० व्या वर्षी आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात अभिनेता आणि एक्स बॉयफ्रेंड शिझान खानला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिझान खानच्या जामिन अर्जावर शनिवारी सुनावणी झाली. पण अभिनेत्याला दिलासा मिळालेला नाही. आता शिझानच्या जामिन अर्जावर ९ जानेवारी म्हणजे सोमवारी सुनावणी होणार आहे.
दरम्यान शिझानच्या कुटुंबियांनी वनीता शर्मा यांच्यावर आरोप केल्यानंतर, त्यांनी ते सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तुनिशाच्या आई म्हणाल्या, ‘मी शिझानला सोडणार नाही. मी याठिकाणी नाती समजण्यासाठी नाही आली, मला न्याय हवाय. तुनिशा माझ्यासाठी सर्वकही होती. शिझान आणि त्याचं पूर्ण कुटुंब यामध्ये सहभागी आहे. गेल्या तीने ते चार महिन्यांपासून तुनिशाचं शिझानच्या कुटुंबासोबत अधिक नातं घट्ट झालं होतं. ‘
‘पूर्ण कुटुंबाने तुनिशाचा वापर केला. मी तुनिशाला पैसै देत नसल्याचे आरोप माझ्यावर करण्यात आले. गेल्या तीन महिन्यात मी तुनिशाला ३ लाख रुपये दिले होते. ते तीन लाख तिने कशासाठी खर्च हे मला माहिती नाही. तुम्ही माझं बँक स्टेटमेंट पाहू शकता.’ असं म्हणत तुनिशा शर्माच्या आईने शिझानच्या कुटुंबाने लगावलेले गंभीर आरोप फेटाळले आहेत.