अभिनेत्रीचा मृतदेह पाहून आईने फोडला हंबरडा; शुद्ध हरपली आणि…
'माझं बाळ गेलं...', आभिनेत्रीच्या आईवर दुःखाचं डोंगर
Tunisha Sharma Death Case : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माने अचानक जगाचा निरोप घेतल्यामुळे कुटुंबासह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शनिवारी दुपारी 03:15 मिनिटांनी तुनिशाने गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी तुनिशावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तुनिशाच्या आत्महत्येने प्रत्येला धक्का बसला आहे. पण अभिनेत्रीच्या आईवर मात्र दुखःचं डोंगर कोसळलं आहे. अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर आईची शुद्ध हरपली एवढंच नाही, तर अभिनेत्रीच्या आईला चालता देखील येत नव्हतं.
मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा रुग्णालयात तुनिशाच्या आईने लेकीचा मृतदेह पाहिला तेव्हा त्या बेशुद्ध झाल्या… असं सांगण्यात येत आहे. सध्या तुनिशाच्या आईचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या नातेवाईकांची मदत घेवून चालताना दिसत आहेत.
View this post on Instagram
तुनिशाच्या आईचा व्हिडीओ ताहीर जासूस या इन्स्टाग्राम पोजवरुन पोस्ट करण्यात आला आहे. सोमवारी तुनिशाच्या आई रुग्णालयात लेकीचा मृतदेह पाहण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा आपल्या 21 वर्षांच्या मुलीला मृत अवस्थेत पाहून त्या स्वतःला सावरु शकल्या नाहीत.
तुनिशाने आईने शिझानवर केले गंभीर आरोप ‘शिझानने तुनिशाला फसवलं आहे. शिझान तुनिशासोबत रिलेशनशीपमध्ये होता. त्याने तुनिशाला लग्न करण्याचं वचन देखील दिलं होतं. पण तुनिशाच्या आधी त्याच्या आयुष्यात एक मुलगी होती.’
तुनिशाच्या आई पुढे म्हणाल्या, ‘शिझानच्या आयुष्यात आधी एक मुलगी असताना देखील त्याने जवळपास 4 महिने माझ्या मुलीचा वापर केला. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की, त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी. माझं बाळ गेलं…’ अशी भावना तुनिशाच्या आईने व्यक्त केल्या आहेत.
तुनिशाने फक्त मालिकांमध्येच नाही, तर सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तुनिषाने बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केलं आहे. तुनिशा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी 2: दुर्गा रानी सिंह’ आणि ‘दबंग 3′ या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.