Huma Qureshi | हुमा कुरेशीच्या ब्रालेस लूकवर भडकला अभिनेता; म्हणाला “सार्वजनिक कार्यक्रमात..”

'दहाड' ही क्राईम-थ्रिलर वेब सीरिज असून यामध्ये सोनाक्षी सिन्हा, विजय वर्मा, गुलशन देवै आणि सोहम शाह यांच्या भूमिका आहेत. रिमा कागती आणि रुचिका ओबेरॉय यांची ही वेब सीरिज 8 एपिसोड्सची आहे.

Huma Qureshi | हुमा कुरेशीच्या ब्रालेस लूकवर भडकला अभिनेता; म्हणाला सार्वजनिक कार्यक्रमात..
Huma QureshiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 3:09 PM

मुंबई : अभिनेत्री हुमा कुरेशीने नुकतीच ‘दहाड’ या वेब सीरिजच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या वेब सीरिजच्या स्क्रिनिंगला आलेल्या हुमाने तिच्या बोल्ड लूकने सर्वांचं लक्ष वेधलं. यावेळी तिने ब्रालेस ड्रेस परिधान केला होता. हुमाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता टेलिव्हिजन अभिनेता पंकित ठक्करनेही हुमाच्या लूकवरून टीका केली आहे. सार्वजनिक कार्यक्रमाला असा ब्रालेस ड्रेस परिधान करणं अत्यंत अशोभनीय आणि अयोग्य असल्याचं त्याने म्हटलंय.

हुमा कुरेशीच्या ब्रालेस लूकची चर्चा

टेलिव्हिजन अभिनेता पंकित ठक्करने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हुमा कुरेशीच्या ड्रेसिंगवर टिप्पणी केली. “भारतीय फिल्म इंडस्ट्करीत मी एक सेलिब्रिटीच्या रुपात अनेक रेड कार्पेट आणि फॅशन मूमेंट्स पाहिले आहेत. नुकतंच दोन अभिनेत्रींनी एका सार्वजनिक कार्यक्रमात माझं लक्ष वेधलं. या दोन अभिनेत्री हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा होत्या. या दोघी आपापल्या स्टाइलमध्ये चांगल्या दिसत होत्या. मात्र हुमा कुरेशीचा ब्रालेस लूक मला अजिबात आवडला नाही, खासकरून भारतासारख्या रुढीवादी समाजात”, असं तो म्हणाला.

हे सुद्धा वाचा

पंकित ठक्करने हुमा कुरेशीवर साधला निशाणा

हुमाच्या ड्रेसिंग सेन्सविषयी तो पुढे म्हणाला, “हुमा कुरेशीच्या ब्रालेस ड्रेसमध्ये अंगप्रदर्शन इतकं अधिक होतं, जे पुराणमतवादी भारतीय विचारसरणीशी सुसंगत नव्हतं. विशेषकरून भारतीय संस्कृतीची नैतिक मूल्ये आणि नम्रता लक्षात घेता सार्वजनिक कार्यक्रमासाठी हा अशोभनीय आणि अयोग्य पोशाख होता. अशा प्रकारच्या ड्रेसिंगमुळे तुम्ही पारंपरिक भारतीय मूल्यांबाबत आदर करत नसल्याचा आणि बंडखोर असल्याचा संदेश जातो.”

हुमा कुरेशीने ‘दहाड’च्या स्क्रिनिंगला प्लंजिंग नेकलाइनवाला प्रिंटेड ड्रेस परिधान केला होता. तर दुसरीकडे पंकितने सोनाक्षीच्या ड्रेसिंगचं कौतुक केलं. “मॉडर्न फॅशनला स्वीकारणं महत्त्वाचं असतंच. पण भारताच्या सांस्कृतिक मापदंडांविषयी आदरपूर्वक अशी ती फॅशन हवी. त्या कार्यक्रमातील सोनाक्षी सिन्हाचा लूक या गोष्टीचा पुरावा आहे. हुमा कुरेशी यातून हे शिकू शकते की योग्य प्रकारे कपडे परिधान करावेत आणि तरुणाईसमोर आदर्श सादर करावा”, असं तो पुढे म्हणाला.

‘दहाड’ ही क्राईम-थ्रिलर वेब सीरिज असून यामध्ये सोनाक्षी सिन्हा, विजय वर्मा, गुलशन देवै आणि सोहम शाह यांच्या भूमिका आहेत. रिमा कागती आणि रुचिका ओबेरॉय यांची ही वेब सीरिज 8 एपिसोड्सची आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.