शिव ठाकरे याचे ‘ते’ रोमांस करतानाचे फोटो व्हायरल, अखेर ती मुलगी…
शिव ठाकरे हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. शिव ठाकरेची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे कायमच सोशल मीडियावर शिव चांगलाच सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही शिव दिसतो.
बिग बॉस फेम शिव ठाकरे हा कायमच चर्चेत असतो. शिव ठाकरेची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. शिव ठाकरे सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. शिव ठाकरे याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये बिग बॉससह खतरो के खिलाडीमध्ये धमाकेदार गेम खेळला. शिव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चांगलाच चर्चेत आहे. शिव ठाकरे डेजी शाह हिला डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, यावर दोघांनीही भाष्य करणे टाळले आहे.
सतत खासगी आयुष्यामुळे शिव ठाकरे हा चर्चेत असतानाच आता दुसरीकडे शिव ठाकरे याने एक फोटो शेअर केलाय. या फोटोवरून शिव ठाकरे याने थेट सांगितले की, तो सिंगल नक्कीच नाहीये, त्याच्या आयुष्यामध्ये कोणीतरी मुलगी आहे. विशेष म्हणजे मुलीसोबतचा फोटोही त्याने शेअर केलाय. या फोटोमध्ये शिव ठाकरे हा अत्यंत रोमांटिक देखील दिसतोय.
शिव ठाकरे याने शेअर केलेल्या फोटोमध्ये मुलगी दिसत असून तो त्या मुलीच्या कपाळावर किस घेतोय. मात्र, शिव ठाकरे याच्या आयुष्यात असलेली ही मुलगी नेमकी कोण…याबद्दल खुलासा हा होऊ शकला नाहीये. कारण शिव ठाकरे याने मुलीचा चेहरा दिसू दिला नसून चेहऱ्यावर इमोजी टाकला आहे. यामुळे चेहरा अजिबात दिसत नाहीये.
शिव ठाकरे याने शेअर केलेला हा फोटो पाहून अनेकांनी म्हटले आहे की, ही डेजी शाहच आहे. शिव ठाकरे याने हा फोटो त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शिव ठाकरे हा आपल्या गर्लफ्रेंडबद्दल बोलताना दिसला होता. आता तर त्याने थेट फोटोच शेअर केलाय.
शिव ठाकरे हा म्हणाला होता की, मला अशी मुलगी पाहिजे आहे, जी नाते सांभाळू शकते. योग्य ठिकाणी योग्य कपडे घालेल. हेच नाही तर शिव ठाकरे याने हे देखील स्पष्ट केले की, आपण पोजेसिव्ह बॉयफ्रेंड आहोत. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, शिव ठाकरे हा लवकरच सलमान खान याच्या चित्रपटामध्ये धमाका करताना दिसले. मात्र, याबद्दल अजूनही खुलासा हा होऊ शकला नाहीये.