Uorfi Javed | उर्फी जावेद हिच्यासोबत घडली अत्यंत मोठी घटना, धक्कादायक खुलासा, थेट पापाराझी यांच्यासमोरच अभिनेत्रीचे
उर्फी जावेद हे नेहमीच चर्चेत असणारे नाव आहे. मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय कपडे घालेल याचा अजिबातच अंदाजा लावला जाऊ शकत नाही. अनेकदा उर्फी जावेद हिच्यावर तिच्या कपड्यांमुळे टिका देखील केली जाते. उर्फी जावेद हिचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे.
मुंबई : उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. परंतू उर्फी जावेद (Uorfi Javed) हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधूनच मिळालीये. उर्फी जावेद हिची आज सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. उर्फी जावेद हिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ (Video) देखील तूफान व्हायरल होताना दिसतात. उर्फी जावेद ही अनेकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील येते. इतकेच नाही तर उर्फी जावेद हिला काही दिवसांपूर्वीच तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याची धमकी ही दिसली होती.
मुळात म्हणजे उर्फी जावेद हिला मिळणाऱ्या धमक्यांचा काहीच परिणाम होत नाही. उर्फी जावेद हिच्या विरोधात काही दिवसांपूर्वीच मध्यप्रदेशमध्ये काही महिला या रस्त्यावर उतरल्या होत्या. आपले स्वप्न पूर्ण करण्याची काही वर्षांपूर्वीच उर्फी जावेद हिने मुंबई गाठली. उर्फी जावेद ही मुळ उत्तरप्रदेशची आहे. उर्फी जावेद हिने अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या.
उर्फी जावेद हिने तिच्या इंस्टा स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळेच आता उर्फी जावेद ही चर्चेत आहे. मात्र, उर्फी जावेद हिने शेअर केलेला हा व्हिडीओ तिच्या अतरंगी लूकचा वगैरे अजिबात नाहीये. उर्फी जावेद हिच्यासोबत एक अत्यंत मोठी घटना घडलीये. या व्हिडीओमध्ये त्याबद्दलच बोलताना उर्फी जावेद ही दिसत आहे.
बरेच लोक ज्या विषयावर बोलणे टाळतात, त्या विषयावर बिनधास्तपणे उर्फी जावेद ही बोलताना दिसत आहे. उर्फी जावेद म्हणाली की, काही वेळापूर्वीच माझ्यासोबत एक विचित्र घटना घडली आहे. पापाराझी यांच्यापुढे येण्याच्या दोन सेकंद पहिले माझा ड्रेस फाटला. मला काय करावे हे कळत नव्हते. मात्र, माझा ड्रेस हा स्कीन रंगाचा असल्याने कोणाला काही समजले नाही.
मी पापाराझी यांच्यासमोर फाटलेल्या ड्रेसमध्येच गेले. परंतू ड्रेस हा स्कीन रंगाचा असल्याने समजले नाही. यावेळी उर्फी जावेद ही तिचा फाटलेला ड्रेस देखील दाखवताना दिसत आहे. उर्फी जावेद ही आता याच व्हिडीओमुळे तूफान चर्चेत आलेली दिसत आहे. उर्फी जावेद हिने अगदी कमी कालावधीमध्ये तिच्या अतरंगी लूकमुळे खास ओळख ही मिळवली आहे.
काही दिवसांपूर्वीच विमानतळावर एक व्यक्ती हा उर्फी जावेद हिला म्हणाला की, असे कपडे घालून तू देशाचे नाव खराब करत आहे. यानंतर या व्यक्तीचा चांगलाच समाचार घेताना उर्फी जावेद ही दिसली. हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला. उर्फी जावेद हिच्या या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसले.