पतीकडून मारहाण, मुलाच्या जन्मानंतर घटस्फोट, ‘ही’ अभिनेत्री थाटणार दुसरा संसार?

Love Life : पहिलं लग्न ठरलं अपयशी, नवऱ्याच्या आयुष्यात परकी स्त्री आल्यामुळे 'या' अभिनेत्रीचा तुटला संसार, मुलाच्या जन्मानंतर करणार दुसरं लग्न? अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य... आज मुलासोबत एकटीच जगतेय आयुष्य... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

पतीकडून मारहाण, मुलाच्या जन्मानंतर घटस्फोट, 'ही' अभिनेत्री थाटणार दुसरा संसार?
Follow us
| Updated on: Mar 23, 2024 | 11:32 AM

इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कपल आहेत, ज्यांनी लग्नाच्या काही वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटची प्रक्रिया सुरु असताना अनेक सेलिब्रिटी कपलने एकमेकांवर गंभीर आरोप केले आणि मुलांच्या जन्मानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. असंच काही झालं आहे टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री निशा रावल हिच्यासोबत. निशा रावल हिचं लग्न 2012 मध्ये ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ फेम अभिनेता करण मेहरा याच्यासोबत झालं होतं. दोघांना एक मुलगा देखील आहे. लग्नानंतर निशा – करण यांचा सुखी संसार सुरु होता. पण 2021 मध्ये दोघांच्या नात्याने वेगळं वळण घेतलं आणि दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला…

घटस्फोटानंतर निशा मुलगा कविश याचा ‘सिंगल मदर’ म्हणून सांभाळ करत आहे. निशा आता तिच्या लहान मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण अभिनेत्रीला कायम दुसऱ्या लग्नाबद्दल विचारण्यात येतं. यावर निशा म्हणते, ‘कार, आलिशान घर खरेदी करणाऱ्या शूरवीर व्यक्तीच्या शोधात मी नाही… कारण माझ्यासाठी एका जोडीदारापेक्षा मानसिक आरोग्य अधिक महत्त्वाचं आहे. मला असा जोडीदार हवा जो फक्त माझा आदर करणार नाही तर, माझ्या मुलावर देखील प्रेम करेल…’

‘मला माझा जोडीदार दयाळू असायला हवाय… यावर मी कोणत्याही प्रकारची तडजोड करु शकणार नाही. मी माझं आयुष्य माझ्या अटींवर जगते आणि मला माझ्या जोडीदारामध्ये ही गोष्ट हवी आहे. माझ्यासाठी तुमच्या सर्वांचं प्रेम खूप आहे. मी सिंगल म्हणून आयुष्यात यशाच्या शिखरावर चढत आहे. कोणाला माहिती आहे का देवाने आपल्यासाठी काय योजना केली आहे….?’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, निशा रावल प्रसिद्ध आणि लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. तिने आतपर्यंत ‘आने वाला पल’, ‘केसर’, ‘मैं लक्ष्मी तेरे आंगन की’, आणि ‘नच बलिये 5’ यांसरख्या मालिका आणि शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. एवढंच नाहीतर, निशा हिला अभिनेत्रीच्या कंगना रनौत हिच्या ‘लॉक अप’ शोमध्ये देखील पाहण्यात आलं.

करण याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री तिच्या आयुष्यात आनंदी आहे. मुलासोबत अभिनेत्री आनंदी आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. अभिनेत्री कायम मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर निशाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.