Ankita Lokhande | अंकिता लोखंडे हिच्यावर दु:खाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीने घेतला जगाचा निरोप

अंकिता लोखंडे हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. अंकिता लोखंडे हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. इतकेच नाही तर अंकिता लोखंडे हिने काही बाॅलिवूड चित्रपटांमध्ये देखील महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत.

Ankita Lokhande | अंकिता लोखंडे हिच्यावर दु:खाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीने घेतला जगाचा निरोप
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 5:40 PM

मुंबई : पवित्र रिश्ता या मालिकेतून ओळख मिळवणारी अभिनेत्री अर्थात अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अंकिता लोखंडे हिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन (Passed away) झाले आहे. अंकिता लोखंडे ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय दिसते आणि मोठी फॅन फाॅलोइंग ही अंकिता लोखंडे हिची बघायला मिळते. आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या अपडेट अकिंता लोखंडे कायमच आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना देखील दिसते.

अंकिता लोखंडे हिच्या वडिलांचे निधन झाले आहे. अंकिता हिच्या वडिलांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी इंटरफेस अपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आले आहे. उद्या ओशिवरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, अंकिता लोखंडेच्या वडिलांच्या निधनाचे कारण अद्याप कळू शकले नाहीये.

वडिलांच्या निधनानंतर अंकिता लोखंडे ही पूर्णपणे तुटली असल्याचे सांगितले जात आहे. अंकिता ही तिच्या वडिलांच्या अत्यंत जवळ होती. कायमच सोशल मीडियावर वडिलांसोबतचे खास फोटो शेअर करताना अंकित दिसत असतं. वडिलांच्या निधनाने अंकिता लोखंडे हिला मोठा धक्का बसला आहे.

अंकिता लोखंडे हिने 2009 मध्ये एकता कपूर हिची मालिका पवित्र रिश्ताच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरूवात केली आणि तिला खरी ओळख त्याच मालिकेतून मिळाली. पवित्र रिश्ता मालिकेमध्येच सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची ओळख झाली. काही वर्षे सुशांत सिंह आणि अंकिताने एकमेकांना डेट केले होते.

फक्त टीव्ही मालिकाच नाही तर अनेक हिट चित्रपटांमध्ये अंकिता लोखंडे ही महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसली आहे. काही दिवसांपूर्वीच अंकिता लोखंडे ही पती विक्की जैन याच्यासोबत दुसऱ्यांदा लग्न करताना दिसली. याचे काही फोटोही अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावर शेअर केले होते. अंकिता लोखंडे हिच्या वडिलांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.