Charu Asopa | चारू असोपा हिला बसला मुंबईच्या पावसाचा फटका, रात्रभर अभिनेत्री चक्क
चारू असोपा ही गेल्या काही दिवसांपासून सतत तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत होती. आता चारू असोपा आणि राजीव सेन यांचा घटस्फोट झालाय. घटस्फोट होण्याच्या अगोदर दोघांनाही एकमेकांवर अत्यंत गंभीर आरोप हे केले. आता चारू असोपा हिने परत एकदा कामाला सुरूवात केलीये.
मुंबई : राजीव सेन याची एक्स पत्नी चारू असोपा (Charu Asopa) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच राजीव सेन आणि चारू असोपा यांचा घटस्फोट झालाय. चारू असोपा आणि राजीव सेन (Rajiv Sen) यांना एक मुलगी देखील आहे. घटस्फोट होण्याच्या अगोदर चारू असोपा हिने राजीव सेन याच्यावर अत्यंत गंभीर आरोप (Serious charges) हे केले होते. इतकेच नाही तर चारू असोपा हिने थेट म्हटले होते की, मी प्रेग्नेंट असताना राजीव सेन याचे अनैतिक संबंध बाहेर होते. राजीव सेन हा मला नेहमीच खोटे बोलून इतर शहरांमध्ये फिरण्यासाठी देखील जायचा. चारू असोपा हिच्यानंतर राजीव सेन याने देखील चारू असोपा हिच्यावर गंभीर आरोप केले.
चारू असोपा आणि राजीव सेन यांनी दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले. मात्र, घटस्फोट होण्याच्या काही दिवस अगोदरच चारू असोपा हिचा धमाकेदार पध्दतीने वाढदिवस साजरा करताना राजीव सेन हा दिसला होता. या वाढदिवसाचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे बघायला मिळाले होते.
विशेष म्हणजे घटस्फोटानंतर आता चारू असोपा हिने अभिनयाला परत एकदा नव्या जोमाने सुरूवात केली आहे. चारू असोपा ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच चारू असोपा ही दिसते. ब्लाॅगच्या माध्यमातूनही चारू असोपा ही आपल्या आयुष्यात काय सुरू आहे, याची माहिती आपल्या चाहत्यांना देते.
सध्या मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच पावसाचा फटका हा चारू असोपा हिला बसला आहे. सतत पाऊस पडत असल्याने आणि रस्त्यांमध्ये पाणी साचल्याने चारू असोपा हिला एक रात्र सेटवरच काढण्याची वेळ आलीये. याबद्दल सांगताना चारू असोपा म्हणाली की, पावसामुळे माझ्यासह सेटवरील 200 लोक हे सेटवरच अडकले होते.
आम्ही जेवण मागवले होते, परंतू सर्व परिसरात पाणी साचल्याने रात्रीचे जेवण देखील येऊ शकले नाही. आम्ही मेकअप रूम शेअर करत रात्र तिथेच काढली. आमच्या गाड्यांमध्ये देखील पाणी गेले. काही लोक तर चक्क मालिकेच्या सेटवर म्हणजे तेथील सोप्यावर वैगेर झोपले, असल्याचे म्हणताना देखील चारू असोपा ही दिसली.