‘नात्याचा तमाशाच बनवलाय’; सुष्मिता सेनच्या वहिनीवर का भडकले नेटकरी?

भांडणं, घटस्फोट अन् पुन्हा आता एकत्र.. टीव्ही अभिनेत्री चारू असोपा-राजीव सेनच्या जोडीला चाहते का वैतागले?

'नात्याचा तमाशाच बनवलाय'; सुष्मिता सेनच्या वहिनीवर का भडकले नेटकरी?
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 9:36 AM

मुंबई: अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि वहिनी चारू असोपा हे नेहमीच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. कधी या दोघांमधील भांडणं तर कधी घटस्फोटाच्या चर्चा माध्यमांसमोर येतात. याआधीही दोघांनी अनेकदा एकमेकांवर विविध आरोप केले आहेत. इतकंच नव्हे तर काही दिवसांपूर्वी चारूने राजीवला घटस्फोट देण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर नेटकरी भडकले आहेत. कारण भांडणानंतर दोघांनी एकत्र येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा चारू आणि राजीवने एकमेकांवर गंभीर आरोप केले आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी पॅच-अप केलं.

चारूचं युट्यूब चॅनल असून त्यावर ती सतत व्हिडीओ पोस्ट करत असते. व्लॉगच्या माध्यमातून तिने अनेकदा तिच्या खासगी आयुष्याबाबत खुलासेही केले आहेत. नुकताच तिने तिच्या मुलीसोबतचा एक व्लॉग युट्यूबवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत राजीवसुद्धा पहायला मिळतोय. राजीवला पाहून युजर्स पुन्हा एकदा दोघांना ट्रोल करू लागले.

हे सुद्धा वाचा

या व्हिडीओत चारूने आधी तिच्या संपूर्ण दिवसाचा शेड्युल दाखवला. त्यानंतर व्लॉगच्या शेवटी ती मुलीला राजीवला भेटायला घेऊन जाते. व्हिडीओत राजीव त्याच्या लेकीसोबत चांगला वेळ घालवताना दिसतो. चारू आणि राजीव दोघंही या व्हिडीओत खूप आनंदी दिसतात. इतकंच नव्हे तर जेव्हा चारू तिच्या मुलीचा हात पकडून तिला चालायला शिकवू लागते, तेव्हा मागून राजीव तिला सांभाळायला येतो आणि मुलीचा हात पकडतो.

दोघं एकमेकांसोबत इतके चांगले असताना, सतत सोशल मीडियावर ड्रामा का करता, असे कमेंट्स काही युजर्सने केले आहेत. दोघांना सोबतही राहायचं आहे आणि नात्याचा तमाशाही बनवायचा आहे, असं एकाने लिहिलं. तर घटस्फोटाचा ड्रामा का केला, असा सवाल नेटकऱ्यांनी केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.