दुसऱ्या लग्नानंतर पतीने दिला धोका, गर्लफ्रेंडसोबत करत आहे मजा, अभिनेत्री दु:खी, म्हणाली, बंद…
दलजीत कौर ही नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. दलजीत कौरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. दलजीत कौर हिने निखिल पटेल याच्यासोबत दुसरे लग्न केले. दलजीत कौर हिने तिच्या पतीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. दलजीत कौर हिने नुकताच पोस्ट शेअर केलीये.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले नाव आहे. दलजीत कौर ही आपल्या मालिकांमुळे नाही तर यावेळी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलीये. दलजीत कौरने दुसरे लग्न केन्याचा बिझनेसमॅन निखिल पटेल याच्यासोबत केले. अत्यंत खास पद्धतीने हा विवाहसोहळा भारतामध्ये रंगला. फक्त दलजीत कौर हिच नाही तर निखिल पटेल याचे देखील हे दुसरे लग्न होते. निखिल पटेल याच्यासोबतच्या लग्नानंतर दलजीत कौर ही केन्याला शिफ्ट झाली. लग्न होऊन काही महिने दलजीत कौर आणि निखिलचा संसार चांगला सुरू होता.
अचानक दलजीत कौर ही भारतामध्ये आपल्या मुलासह परतली. यानंतर दलजीत कौर आणि निखिल पटेल यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे सातत्याने सांगितले जात होते. मात्र, यावर काही दिवस भाष्य करणे दलजीत कौर हिने टाळले. लग्नाला काही महिने पूर्ण होत नाहीत तोवरच दलजीत कौर आणि निखिल पटेल यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे बघायला मिळतंय.
दलजीत कौर हिने निखिल पटेल याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे थेट म्हटले. यानंतर निखिल पटेल यानेही मोठे खुलासे केले. हेच नाही तर निखिल पटेल याने तिला कायदेशीर नोटीस देखील पाठवलीये. आता नुकताच दलजीत कौर हिने इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर करत परत एकदा निखिल पटेल याच्यावर गंभीर आरोप केले.
पहिल्या फोटोमध्ये दलजीत कौर हिने केन्यामधील घराचा फोटो शेअर केलाय. विशेष म्हणजे ही पेंटिंग स्वत: दलजीत कौर हिने तयार केलीये. दलजीत कौरने म्हटले की, हे मिटून टाकू शकतो. परंतू, सत्य कसे लपवणार. सत्य इतके कमजोर नसते, असेही दलजीत कौर हिने म्हटले आहे. यासोबतच दलजीत कौर हिने निखिल पटेल याची स्टोरी रिशेअर केली आहे.
या पोस्टमध्ये दिसत आहे की, निखिल पटेल हा केन्यामध्ये SN नावाच्या मैत्रिणीसोबत जेवायला गेलाय. ही पोस्ट रिशेअर करत दलजीत कौरने लिहिले की, ओह…हे प्रेम थांबता थांबत नाहीये…इतक्या साऱ्या नोटीस पाठवल्या मला. तू तिच्यासोबतच्या इतक्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत आहेस. निखिल पटेल तू मला पोक करणे बंद करायला हवेस. आता दलजीत कौरची पोस्ट व्हायरल होत आहे.