दहा महिन्यात तुटले दुसरे लग्न, अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत म्हटले, देवाने सर्वकाही…

अभिनेत्री दलजीत काैर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. दलजीत काैरच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. दलजीत काैर हिने मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. दलजीत काैर हिने नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये, तिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

दहा महिन्यात तुटले दुसरे लग्न, अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत म्हटले, देवाने सर्वकाही...
Dalljiet Kaur
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 12:45 PM

टीव्ही अभिनेत्री दलजीत काैर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. दलजीत काैरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. दलजीत काैर हिच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. दलजीत काैरचे दुसरे लग्न अवघ्या दहा महिन्यांमध्येच तुटले आहे. लग्नानंतर दलजीत काैर ही केन्यामध्ये शिफ्ट झाली होती. केन्याचा व्यावसायिक निखिल पटेल याच्यासोबत दलजीत काैर हिने लग्न केले. विशेष म्हणजे यांनी लग्नाच्या अगोदर काही महिने डेट केले आणि मगच लग्न करण्याचा निर्णय घेतला. निखिल पटेल याला अगोदरच्या पत्नीच्या दोन मुली आणि दलजीत काैर हिला एक मुलगा आहे.

दलजीत काैर ही लग्न होऊन काही महिने पूर्ण झाले नाहीत तोवरच भारतामध्ये परतली. दलजीत काैर हिने पती निखिल पटेल याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. हेच नाहीतर विवाहबाह्य त्याचे संबंध असल्याचे देखील दलजीत काैर हिने म्हटले. आपले सर्व सामानही निखिलच्याच घरी सोडून दलजीत काैर ही भारतात परतली.

आता दलजीत काैर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. दलजीत काैरची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. दलजीत काैरने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, शांत बसा आणि देवाला गोष्टी सांभाळू द्या. जे काही झाले ते देवाने बघितले आहे. या पोस्टनंतर चाहते हे दलजीत काैरला हिंमत देताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वीच दलजीत काैर हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत मंगळसूत्र दाखवले होते. दलजीत काैरचे दुसरे लग्न तुटल्याने दु:खी असल्याचे तिच्या पोस्टवरून स्पष्ट दिसत आहे. दलजीत काैरचे पहिले लग्न हे शालिन भनोट याच्यासोबत झाले होते. दलजीत काैर आणि शालिन भनोट यांचा एक मुलगा देखील आहे. दलजीत काैर हीच मुलाचा सांभाळ करते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.