कॉम्प्रोमाइज करावंच लागेल…, चॅनल हेडवर जुही परमार हिने केले गंभीर आरोप
Juhi Parmar : बिकिनी घालावीच लागेल..., कॉम्प्रोमाइज करावंच लागेल...; झगमगत्या विश्वात अभिनेत्री जुही परमार हिला आलेल्या अत्यंत वाईट अनुभव... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जुही परमान हिने सांगितलेल्या घटनेची चर्चा...
‘कुमकुम – एक प्यारा सा बंधन’ मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री जुही परमार सध्या तुफान चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने मालिकेत ‘कुमकुम’ या भूमिकेला न्याय दिला. आज देखील अभिनेत्रीला चाहते विसरु शकलेले नाहीत. सध्या अभिनेत्री कोणत्या मालिकेमुळे नाहीतर, तिला आलेल्या वाईट अनुभवामुळे चर्चेत आली आहे. जुही हिने वयाच्या 17 व्या वर्षी कास्टिंग काऊचाचा सामना केला आहे. अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने तिला आलेल्या अनुभवावर मौन सोडलं आहे.
इंडस्ट्रीमध्ये टिकून राहायचं असेल तर, तडजोड करावी लागेल… असं अभिनेत्रीला सांगण्यात आलं होतं. शिवाय शुटिंग दरम्यान अभिनेत्री बिकिनी घालण्यासाठी देखील बळजबरी केली होती. नुकताचा झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने यावर मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जुही परमार हिची चर्चा रंगली आहे.
मुलाखतीत अभिनेत्री जुही परमार म्हणाली, ‘एका चॅनेल हेडचा मला एका म्युझीक अल्बमच्या शूटसाठी फोन आला होता. तेव्हा त्याने कॅमेऱ्यासमोर मला टू-पीस बिकिनी घालायला सांगितली. मी त्याला स्पष्ट नकार दिला. तेव्हा हेड रागात उठला आणि बोल्ड सीनला नकार दिल्यास म्हणू लागला…. इंडस्ट्रीमध्ये तुला तडजोड करावी लागेल…’
यावर जुही म्हणाली, ‘मला कोणती चांगली ऑफर मिळाली नाही तरी चालेल, पण मी कधीच वाईट काम करणार नाही. त्यापेक्षा मी घरी परत जाईल. त्यानंतर अनेक वर्षांनी माझी भेट त्या चॅनेल हेडसोबत झाली. तेव्हा मी माझी स्वतःची कार देखील विकत घेतली होती…’
‘चॅनेल हेड त्याच्या ऑफिस बाहेर उभा होता. मी त्याला म्हणाले, कुठेच आणि कोणतीच तडजोड न करता मी यश मिळवलं आहे. शिवाय चांगलं आयुष्य देखील जगत आहे…’ असं जुही त्या चॅनेल हेटला म्हणाली. यावेळी अभिनेत्रीने कोणाचं नाव घेतलं नाही. सध्या सर्वत्र जुही हिची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, फक्त जुही हिनेच नाहीतर, अनेक अभिनेत्रींनी झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान निर्माण करण्याआधी अनेक वाईट गोष्टींचा सामना केला आहे. आता अभिनेत्री मोकळेपणाने त्यावर बोलतात. सध्या जूही हिने स्वतःचा अनुभव सांगितला आहे.
जुही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री कायम मुलीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. घटस्फोटानंतर सिंगल मदर म्हणून अभिनेत्री मुलीचा सांभाळ करत आहे.