अंथरुणातून उठणं कठीण, दिवसातून 30 गोळ्या, इंजेक्शन… मॉनी रॉय प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

Mouni Roy | आता स्वतःच्या दिलखेच अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी मौनी रॉय एकेकाळी होती अंथरुणाला खिळलेली... नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने केला मोठा खुलासा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मौनी रॉय हिची चर्चा... अभिनेत्रीची होती अत्यंत चिंताजनक

अंथरुणातून उठणं कठीण, दिवसातून 30 गोळ्या, इंजेक्शन... मॉनी रॉय प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 2:05 PM

अभिनेत्री मौनी रॉय हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. टीव्ही विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मौनी हिने अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. पण आता अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे नाही तर, प्रकृतीमुळे चर्चेत आली आहे. नुकताच, झालेल्या एका मुलाखतीत मौनी हिने तिच्या आयुष्यातील कठीण दिवसांबद्दल सांगितलं आहे. एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री उठू शकत नव्हती, दिवसातून 30 – 30 गोळ्या तर कधी इंजेक्शन अभिनेत्रीला घ्यावे लागत होते.

मौनी रॉय म्हणाली, ‘नागीन मालिका सुरु होण्यापूर्वी माझी प्रकृती प्रचंड खालावली होती. मी कायम अस्वस्थ असायची. एकावेळी मला असं वाटलं की माझं आयुष्य संपलं आहे. मी खूप आजारी होती. मी ‘झलक दिखला जा 9′ पूर्ण केलं आणि माझ्य पाठीचा कणा मोडला होता…’

‘स्लिप डीजनरेशन आणि स्कोलियोसिस झाल्यामुळे मी सरळ उभं देखील राहता येत नव्हतं… नागीन मालिकेसाठी ऑफर आली तेव्हा मी तीन महिने अंथरुणात होती. माझं वजन दिवसागणिक वाढत होतं. कारण मी दिवसाला 30 गोळ्या खात होती. कधीकधी इंजेक्शन देखील घ्यावे लागत होते…’ अनेक वर्षांनंतर मौनी हिने स्वतःच्या आयुष्यातील वाईट दिवसांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, ‘नागीन’ मालिका ऑफर केल्याबद्दल मौनी हिने एकता कपूर हिचे आभारही व्यक्त केले. अभिनेत्री म्हणाली, ‘नागीन’ मालिका सुरुवातीला 3 महिन्यांसाठी तयार करण्यात आली होती. पण प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रेमामुळे मालिकेचा कालावधी 7 महिने केला…

मौनी रॉय कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकताच अभिनेत्री ‘शोटाईम’ वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. सीरिजमध्ये मौनी हिच्यासोबत, इमरान हाशमी, नसीरुद्दीन शाह, महिमा मकवाना, राजीव खंडेलवाल आणि श्रिया सरन मुख्य भूमिकेत होते.

मौनी रॉय हिने अनेक सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत देखील मौनी हिने स्क्रिन शेअर केली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मौनी रॉय हिची चर्चा रंगली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.