मुलीच्या जन्मानंतर नवऱ्याने सोडली साथ, एकट्या अभिनेत्रीवर लेकीची जबाबदारी; म्हणते, ‘माझं संपूर्ण आयुष्य’

Actress Life | मुलीच्या जन्मानंतर नवऱ्याने नाही केला कसलाच विचार, सोडली अभिनेत्रीची साथ, आज मुलीसोबत जगतेय एकटं आयुष्य; अभिनेत्री म्हणाली, 'माझं संपूर्ण आयुष्य...', झगमगत्या विश्वात अनेक अभिनेत्रींनी खासगी आयुष्यात सोसल्या आहेत अडचणी...

मुलीच्या जन्मानंतर नवऱ्याने सोडली साथ, एकट्या अभिनेत्रीवर लेकीची जबाबदारी; म्हणते, 'माझं संपूर्ण आयुष्य'
Follow us
| Updated on: May 18, 2024 | 10:40 AM

अनोळख्या व्यक्तीसोबत प्रेम झालं… अनेक वर्ष डेट केल्यानंतर अभिनेता – अभिनेत्रीने लग्नाचा निर्णय घेतला. लग्नाच्या काही वर्षांनंतर मुलीला जन्म देखील दिला… पण लग्न मात्र फार काळ टिकलं नाही… अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला… आज अभिनेत्री ‘सिंगल मदर’ म्हणून लेकीचा सांभाळ करत आहे. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री संजीदा शेख आहे… लग्नाच्या 10 वर्षांनंतर घटस्फोट झाल्यानंतर संजीदा हिने मुलीची जबाबदारी घेतली.

घटस्फोटानंतर अभिनेत्रीने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. अभिनेत्री आज मुलीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्रीच्या आयुष्यात मोठं संकट आलं होत. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत संजीदा हिने खासगी आयुष्य आणि मुलीबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र संजीदा हिची चर्चा रंगली आहे.

मुलीबद्दल संजीदा म्हणाली, ‘माझी लेक माझी ताकद आहे… तिने मला आयुष्यात हिंमतीने पुढे कसं जायचं शिकवलं आहे. ज्याबद्दल मी कधी विचार देखील करु शकत नाही. मला असा वाटतं मी आता पूर्वापेक्षा अधिक स्ट्राँग झाली आहे. मी माझ्यात असलेला कमीपणा मान्य केला आहे आणि स्वतःवर प्रेम करायला शिकली आहे.’

हे सुद्धा वाचा

‘मी जेव्हा माझ्या मुलीला पाहिलं तेव्हा मी म्हणाली, छोटी संजीदा आता आली आहे. माझं पूर्ण आयुष्य तिच्या भोवती फिरत आहे. माझी लेक माझ्या भावाला पा म्हणून हाक मारते. ‘ असं देखील अभिनेत्री म्हणाली. संजीदा कायम तिच्या मुलीसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

संजीदा हिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2012 मध्ये अभिनेता आमिर अली यांच्यासोबत लग्न केलं. टीव्ही विश्वातील पॉवर कपल म्हणून देखील दोघांची ओळख होती. पण संजीदा आणि अली यांचं नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 9 वर्षांनंतर म्हणजे 2021 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2022 मध्ये दोघांनी घटस्फोट झाल्याची अधिकृत घोषणा केली.

संजीदा गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. ‘हीरामंडी’ सीरिजमध्ये अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल माडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.