मुंबई : कलाविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री नीलू (neelu kohli) कोहली यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अचानक पतीचं निधन झाल्यामुळे कोहली कुटुंब दुःखात आहेत. नीलू कोहली यांचे पती हरमिंदर सिंग (harminder singh) यांचं निधन झालं आहे. प्रकृती स्थिर असताना देखील हरमिंदर सिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. हरमिंदर सिंग यांच्या अचानक निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. रिपोर्टनुसार, शुक्रवारी हरमिंदर सिंग यांचं निधन झालं आहे. हरमिंदर सिंग दर्शनासाठी गुरुद्वारात गेले होते. तोथून आल्यानंतर ते बाथरूममध्ये गेले. पण बाथरुममध्येच ते खाली कोसळले.
ही धक्कादायक घटना घडली तेव्हा घरी करणारी एकच व्यक्ती उपस्थित होती. या धक्कादायक घटनेची माहिती नीलू यांच्या जवळच्या व्यक्तीने दिली आहे. एका वेबसाईटला सांगताने ते म्हणाले, ‘गुरुद्वारातून आल्यानंतर घरात एक व्यक्ती त्यांच्यासाठी जेवण तयार करत होती. पण बाथरुममधून बराच वेळ बाहेर न आल्यामुळे हाउस हेल्परने जावून पाहिलं तर ते खाली जमीनीवर पडलेले होते.’
नीलू यांच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना अचानक घडली आहे. हरमिंदर सिंग यांची प्रकृती स्थिर होती. डायबटीज शिवाय त्यांना इतर कोणताही आजार नव्हता. रविवार हरमिंदर सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळत आहे. हरमिंदर सिंग यांच्या निधनानंतर नीलू आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हरमिंदर सिंग यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नीलू कोहली यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नीलू यांनी १९९९ साली प्रदर्शित झालेल्या ‘दिल क्या करे’ सिनेमातून आपल्या करियरला सुरुवात केली होती. आजही ते कायम त्यांच्या सिनेमांमुळे चर्चेत असतात. (actress nilu kohli husband harminder singh)
‘दिल क्या करे’ सिनेमात नीलू यांच्यासोबत अजय देवगन, काजोल आणि महीमा चौधरी यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली. एवढंच नाही तर, नीलू यांनी ‘हिंदी मीडियम’, ‘हाउसफुल 2’ यांसारख्या सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. त्यांनी हिंदीसोबतच अनेक पंजाबी मालिकांमध्ये देखील काम केलं आहे.