Bigg Boss 17 | सलमान खानच्या शोबद्दल मोठी घोषणा; टीव्ही स्टार्ससोबत दिसणार प्रसिद्ध युट्यूबर

Bigg Boss 17 | टीव्ही विश्वातील वादग्रस्त शो पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस; सलमान खान याच्या Bigg Boss 17 मधील १२ स्पर्धक समोर... सध्या सर्वत्र भाईजानच्या शोची चर्चा...

Bigg Boss 17 | सलमान खानच्या शोबद्दल मोठी घोषणा; टीव्ही स्टार्ससोबत दिसणार प्रसिद्ध युट्यूबर
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 11:41 AM

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : ‘बिग बॉस’ शोच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. ‘बिग बॉस’चे आतापर्यंतचे सर्व सीझन हीट ठरले. एवढंच नाही तर ‘बिग बॉस ओटीटी’ला देखील प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. नुकताच ‘बिग बॉस ओटीटी 2’ सीझन संपला. आता ‘बिग बॉस 17’ ची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे ‘बिग बॉस 17’ शो कधी सुरु होईल, शोमध्ये स्पर्धक कोण असतील? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. अशात ‘बिग बॉस 17’ बद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. ‘बिग बॉस 17’ मध्ये प्रसिद्ध टीव्ही सेलिब्रिटी आणि काही प्रसिद्ध युट्यूबर असणार आहेत. ‘बिग बॉस 17’ शोच्या १२ स्पर्धकांची नावे समोर आली आहेत.

अभिनेत्री जेनिफर विंगेट, निया शर्मा आणि दिव्यांका त्रिपाठी यांच्या नावांची ‘बिग बॉस 17’ साठी तुफान चर्चा रंगत आहेत. रिपोर्टनुसार सिंगल वर्सेस कपल अशी शोची थीम असणार आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ प्रमाणे प्रसिद्ध युट्यूबर देखील ‘बिग बॉस 17’मध्ये दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस ओटीटी’चा विनर एल्विश यादव देखील ‘बिग बॉस 17’मध्ये दिसणार आहे.

‘बिग बॉस 17’ च्या कपलबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन देखील ‘बिग बॉस 17’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसणार असल्याची चर्चा रंगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शोच्या निर्मात्यांनी अंकिता आणि विकी यांना शोसाठी अप्रोच केलं आहे.

अंकिता – विकी यांच्याशिवाय जय सिंग देखील सलमान खान याच्या शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा रंगत आहे. गेल्या दोन – तीन सीझनपासून जय सिंग याचं नाव चर्चेत आहे. अशात ‘बिग बॉस 17’मध्ये जय सिंग स्पर्धक म्हणून समोर येईल का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रसिद्ध इंफ्लूएन्सर हर्ष बेनीवाला देखील शोच्या भाग असू शकतो. हर्षने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर बिग बॉसचा फोटो पोस्ट केला होता. म्हणून चर्चांना उधाण आलं आहे. कंवर ढिल्लो आणि एलिस कौशिक देखील ‘बिग बॉस 17’मध्ये स्पर्धक म्हणून चाहत्यांच्या भेटीस येवू शकतात. दोघे गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

उडारिया फेम ईशा मालवीय आणि ट्विंकल अरोरा देखील ‘बिग बॉस 17’ शो मध्ये स्पर्धक म्हणून दिसू शकते. तर मल्लिका सिंग बॉयफ्रेंड सुमेध मुदगलकर याच्यासोबत दिसू शकते. सौरव जोशी याच्या नावाची देखील चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर, टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा हिचं नाव देखील ‘बिग बॉस 17’ साठी कंन्फर्म आहे. नील भट्ट आणि अनुराग डोभार याच्या नावाची देखील चर्चा आहे.

‘बिग बॉस 17’ शोबद्दल सांगायचं झालं तर, सीझन सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठड्यात सुरु होण्याची शक्यता आहे. ‘बिग बॉस 17’ च्या होस्टची जबाबदारी देखील अभिनेता सलमान खान याच्या खांद्यावर आहे. सध्या सर्वत्र सलमान खान याच्या ‘बिग बॉस 17’ शोची चर्चा सुरु आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.