बंगालमध्ये क्रिएटिव्ह टॅलेंट सर्वाधिक, OTT च्या मदतीने आम्ही पुन्हा फिल्म उद्योगावर करु शकतो राज्य : Tv9 नेटवर्कचे MD आणि CEO बरुन दास

TV9 बांग्लाच्या घोरेर बायोस्कोप अवॉर्ड शोच्या दुसऱ्या आवृत्तीत बंगालच्या चित्रपट आणि टेलिव्हिजन कलाकारांना पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमात, Tv9 नेटवर्कचे MD आणि CEO बरुण दास यांनी बंगालच्या क्रिएटिव प्रतिभेवर चर्चा केली. ते म्हणाले की, एकेकाळी बॉम्बे फिल्म इंडस्ट्रीवर बंगालचं राज्य होते. ते दिवस आपण परत आणू शकतो.

बंगालमध्ये क्रिएटिव्ह टॅलेंट सर्वाधिक, OTT च्या मदतीने आम्ही पुन्हा फिल्म उद्योगावर करु शकतो राज्य : Tv9 नेटवर्कचे MD आणि CEO बरुन दास
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 8:31 AM

TV9 बांग्लाच्या घोरेर बायोस्कोप अवॉर्ड शोच्या दुसऱ्या आवृत्तीची रंगतदार सुरुवात झाली. यावेळी, Tv9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ, बरुण दास यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि अवॉर्ड शोबद्दल सांगितले. बरुण दास म्हणाले, पश्चिम बंगालच्या संस्कृतीवर बंगाली टेलिव्हीजनच्या मालिका आणि ओटीटी केटेंटच्या प्रभावाला हा पुरस्कार सोहळा ओळखत आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी सर्व फिल्म सुपरस्टार, टीव्ही कलाकार कोलकाता येथील एका ऑडिटोरियममध्ये एकत्र जमले होते.

याआधी पुरस्कार कार्यक्रमाच्या अँकरने Tv9 नेटवर्कचे MD आणि CEO बरुण दास यांची ओळख करुन देत त्यांची फिलॉसॉफी ‘if it is to be, then it is up to me’ याबद्दल सांगितलं. जेव्हा बरुण दास व्यासपीठावर पोहोचले तेव्हा ते म्हणाले की, ‘हे कोणत्याही व्यक्तीचे तत्त्वज्ञान नाही, हे कोणत्याही उद्योगासाठी, कोणत्याही देशासाठी यशाचे तत्त्वज्ञान आहे…’

बरुण दास म्हणाले पुरस्कार सोहळ्यासाठी सुपर स्टार अल्लू अर्जुन कोलकाता याठिकाणी येऊ शकले नाहीत. अभिनेत्याचा ‘पुष्पा 2’ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळेच त्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे ते शेवटच्या क्षणी इथपर्यंत पोहोचू शकले नाहीत, पण त्यांच्या पुष्पा 2 चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगने 50 कोटींचा टप्पा ओलांडला आहे, हा चित्रपट पहिल्याच दिवशी 300 कोटींहून अधिक कमाई करू शकतो.

तुलना करत बरुण दास म्हणाले, ‘बंगाली फिल्म इंडस्ट्री एका वर्षात 100 कोटींची कमाई करु शकते. अल्लू अर्जुन हा रीजनल कलाकार आहे. बंगाल देखील रीजनल फिल्म उद्योग आहे. . आपण आपल्या सर्जनशील क्षमतेचा योग्य प्रकारे वापर करत नाही. कोलकात्यात आमची सर्जनशीलता भारतातील अनेक ठिकाणांपेक्षा जास्त आहे.

टीव्ही नेटवर्कचे एमडी आणि CEO बरुण दास यांनी लेखक एरिन वेनर यांच्या नावाचा उल्लेख करत म्हणाले, त्यांनी एक पुस्तक ‘द ज्योग्राफी ऑफ जीनियस’ लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी जगातील सर्वात सर्जनशील ठिकाणे शोधून काढली आहेत. व्हेनिस, फ्लॉरेन्ससोबतच कोलकाताही त्यांच्या यादीत आहे. रवींद्रनाथ टागोर घराण्याबद्दल काही चुकीची माहिती आहे, परंतु एकंदरीत पुस्तक खरोखर उत्कृष्ट आणि विश्वासार्ह आहे. मी त्यांच्याशी सहमत आहे की कोलकाता हे खरोखर एक रचनात्मक शहर आहे.

सत्यजित रॉय, ऋत्विक आणि मृणाल सेन यांची नावे घेत, TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास म्हणाले, ‘एकेकाळी आम्ही (बंगाली) बॉम्बे फिल्म इंडस्ट्रीवर राज्य करत होतो. भारतातील तीन महान दिग्दर्शक सत्यजित रॉय, ऋत्विक घटक आणि मृणाल सेन हे बंगाली होते. ते दिवस आपण परत आणू शकत नाही का?

बंगाली टेलिव्हिजनला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बरुण दास म्हणाले की, ‘बंगाली टेलिव्हिजनला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. ऋत्विक घटक यांची 100 वी जयंती आहे. आम्ही 2023 मध्ये मृणाल सेन यांची 100 वी जयंती साजरी केली. हीच योग्य वेळ आहे. आपण आपला प्रवास आताच सुरु करु शकतो.

ओटीटी आणि एआयचा उल्लेख करत बरुण दास म्हणाले, ‘OTT आता बंगाली फिल्म उद्योगाची मदद करु शकतो. यामुळे वितरकांचे महत्त्व नाहीसे होत आहे. आता प्रेक्षक राजा आहे. तो कुठेही काहीही पाहू शकतो. स्क्विड गेम या कोरियन थ्रिलर वेबसिरीजचा संदर्भ देत ते म्हणाले की, ही वेब सिरीज जबरदस्त प्रभाव निर्माण करते. ते असेही म्हणाले की एआय एक अज्ञात राक्षस आहे, परंतु मानव त्याच्या क्रिएटिविटीने त्याचा सामना करू शकतो.’

बेंगळुरूमध्ये आयटी बॅक ऑफिसच्या कल्पनेचा संदर्भ देत, Tv9 चे MD आणि CEO बरुण दास म्हणाले, “बंगळुरूने आयटी बॅक ऑफिसमध्ये मोठी कामगिरी केली आहे आणि भारताची सिलिकॉन व्हॅली बनली आहे. तर बंगाल असं का करु शकत नाही? याठिकाणी क्रिएटिविटीची काहीही कमतरता नाही. येथे क्रिएटिविटी सर्वात जास्त आहे. कोलकाता केवळ परवडणारे नाही, तर गुणवत्तेच्या बाबतीतही ते भारताच्या इतर भागांपेक्षा उत्तम आहे. आमच्याकडे क्रिएटिविटी प्रतिभा आहे हे उत्तम आहे. बंगाली चित्रपटसृष्टीचे पुनर्जागरण होण्याची शक्यता आहे, असं मला वाटतं.

'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब.
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?.
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?.
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?.
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी.
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.