Tv9 Public Poll: प्रत्येक वेळेस बाईनच घर का सोडावं? अरूंधती जोगळेकरनं देशमुखांचं घर सोडावं? जनतेचाच कौल वाचा

आईचे भावूक पात्र साकारणारी अरुंधती नव्या लूकमधून प्रेक्षकांच्या समोर आली. आता मालिकेत ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय. अरुंधती घर सोडून जाणार असल्याच्या चर्चांना उधान आलाय. त्यावर प्रेक्षकांचं म्हणणं काय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

Tv9 Public Poll: प्रत्येक वेळेस बाईनच घर का सोडावं? अरूंधती जोगळेकरनं देशमुखांचं घर सोडावं? जनतेचाच कौल वाचा
'आई कुठे काय करते' मालिका
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 11:15 PM

मुंबई : मराठी मालिकेत सर्वात चर्चेत असणारी मालिका म्हणजे, ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte). त्यामधील अरुंधती (Arundhati) हे पात्र प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. आई कुठे काय करते या मालिकेत रोज नवनवित किस्से प्रेक्षकांना रंगवून सांगितले जातात. त्यामुळे या मालिकेत पुढे काय होणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच लागलेली असते. नुकतेच आईचे भावूक पात्र साकारणारी अरुंधती नव्या लूकमधून प्रेक्षकांच्या समोर आली. आता मालिकेत ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय. अरुंधती घर सोडून जाणार असल्याच्या चर्चांना उधान आलाय. त्यावर प्रेक्षकांचं म्हणणं काय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

अरुंधती जोगळेकरनं देशमुखांचं घर सोडावं का?

आई कुठे काय करते या मालिकेची प्रसिद्धी पाहता, tv9 मराठीने युट्यूबवर त्यासंबंधित पोल टाकला होता. त्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. अरुंधतीने देशमुखांचं घर सोडावं का यावर जवळपास 55 टक्के रसिकप्रेक्षक होय असे म्हणाले. त्यावर 24 टक्के रसिकप्रेक्षकांचे म्हणणे आहे, अरुंधतीने घर सोडू नये. tv9 मराठीने प्रेक्षकांसाठी ‘सांगता येत नाही’ असा तिसरा पर्याय उपलब्ध करून दिला होता, त्याला 21 टक्के लोकांचा कौल गेला. म्हणजे 21 टक्के लोक मालिकेत पुढे काय होईल या सभ्रमात आहेत.

Youtube Poll

आई कुठे काय करते मालिकेबाबत टीव्ही 9 मराठीचा युट्यूब पोल

युट्यूबसह आम्ही ट्विटरवरही पोलच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मत जाणून घेतलं. या पोलवरही 400 पेक्षा अधिक जणांनी आपलं मत नोंदवलं आहे. त्यात अरुंधतीने देशमुखांचं घर सोडावं असं मत 63 टक्के लोकांनी व्यक्त केलं आहे. तर 20 टक्के लोक म्हणतात की अरुंधतीने देशमुखांचं घर सोडू नये. त्याचबरोबर 16 टक्के लोकांनी याबाबत सांगता येत नसल्याचं म्हटलंय.

Twitter Poll

आई कुठे काय करते मालिकेबाबत टीव्ही 9 मराठीचा ट्विटरवरील पोल

अरुंधती घर सोडून जाणार का?

देशमुखांच्या घरात सगळ्या पात्रांचा केंद्रबिंदू असणारी अरुंधती आता खरचं मोठा निर्णय घेते की काय याकडे सगळे डोळे लावून बसले आहेत. सध्या मालिकेत मोठे बदल होत आहे. सर्वांची आवडती अरुंधती खऱ्या अर्थाने बदलत आहे. तिचा साडी सोडून पंजाबी ड्रेस घातलेला नवा लूक प्रेक्षकांच्या मनात भरला. नेहमीप्रमाणे अरुंधतीचा बदल काहींना आवडला तर काहींना तडका लावून गेला. नुकत्याच झालेल्या एका भागात अरुंधती गाण्याचं रेकॉर्डिंग करून परत येते. त्यात ती एक रात्र मित्रासोबत असते त्यावर अनिरुद्ध आक्षेप घेत “मित्रासोबत रात्र घालवून आली”, असं म्हणतो. त्यावर अरुंधती दुखावली जाते आणि देशमुखांचं घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. अरुंधती आता नेमकी काय भुमिका घेईल? ती घर सोडून जाईल की घरात राहून अनिरुद्धला करारा जवाब देईल हे पुढील भागात पहायला मिळेल.

इतर बातम्या :

Video: दीपिका, आलियाचं नाव निघालं अन् कंगनाला मिर्च्या झोंबल्या, शेवटी सवाल विचारणाऱ्यांचे माईक बंद केले, काय घडलं?

2 दिवसानंतर फरहान शिबानीचं लग्न, खंडाळ्यातलं फार्म हाऊस सजवलं; मोजक्या लोकांना आमंत्रण

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.