Twinkle Khanna | ‘कोहिनूसह दोन मौल्यवान रत्न परत द्या’, ट्विंकल खन्नाची ब्रिटनकडे मागणी
ब्रिटीश सरकारकडे ट्विंकल खन्ना हिने केली मोठी मागणी... कोहिनूरसह 'या' दोन मौल्यवान रत्नांचा देखील अभिनेत्रीकडून उल्लेख... सध्या सर्वत्र ट्विंकल खन्ना हिची चर्चा...
मुंबई : अभिनेत्री, लेखक आणि इंटीरियर डिझायनर ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) खन्ना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील एका मोठ्या कारणामुळे अभिनेता अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना चर्चेत आली आहे. ट्विंकल खन्ना हिने ब्रिटीश सरकारकडे मोठी मागणी केली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने ब्रिटीश सरकारकडे विनोदी अंदाजात कोहिनूर आणि अन्य दोन मौल्यवान रत्न परत करण्याची मागणी केली आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत. एवढंच नाही तर, अनेक नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्या पोस्टची चर्चा वाऱ्यासारखी सर्वत्र रंगत आहे.
ट्विंकल खन्ना पोस्ट करत म्हणाली, ‘परंपरेनुसार राणीने राज्यभिषेकाच्या वेळी हिऱ्यासोबत मुकूट घातला होता. पण यावेळी बकिंगहॅम पॅलेसने औपचारिक कारवाईत कोहिनूरचा वापर केला जाणार नाही, असे निवेदन जारी केले. याच कारणामुळे भारतीय पुन्हा एकदा कोहिनूर परत करण्याची मागणी करत आहेत. मी ब्रिटनला केवळ कोहिनूरच नाही तर आमचे दोन मौल्यवान रत्न विजय मल्ल्या आणि ललित मोदी यांनाही परत करण्यास सांगत आहे…’ सध्या ट्विंकल खान्ना हिने ब्रिटीश सरकारकडे केलेल्या मागणीची तुफान चर्चा रंगत आहे.
कोहिनूर हिऱ्याबद्दल सांगायचं झालं तर, कोहिनूर हिरा १०५.६ कॅरेटचा रंगहीन हिरा आहे. हा हिरा १३व्या शतकात आंध्र प्रदेशातील गुंटूरजवळ काकतीय राजवंशाच्या कालखंडात सापडला होता. कोहिनूर हिरा अनेक राजघराण्यांच्या ताब्यात होत. त्यानंतर 19 व्या शतकात कोहिनूर हिरा ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरिया यांच्या ताब्यात देण्यात आला… सांगायचं झालं तर, कोहिनूर हिऱ्याबद्दल एक समज आहे. कोहिनूर हिरा शापित आहे आणि तो केवळ स्त्रियांसाठी, विशेषतः राण्यांसाठी सुरक्षित आहे.
Kohinoor and blue tick wapsi, with some anmol confessions This week for @timesofindia with King Charles, Rishi Sunak and even Elon Bhai.https://t.co/4xINNANnfi pic.twitter.com/BHtfs4WfTR
— Twinkle Khanna (@mrsfunnybones) May 14, 2023
ट्विंकल खन्ना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्रीने अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनयाचा निरोप घेतला. ट्विंकल खन्ना दिवंगत अभिनेते राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी आहे. ट्विंकल हिने ‘बरसात, मेला, जान, बादशाह, इंटरनॅशनल खिलाडी, जब प्यार किसी से होता है, इतिहास आणि जोरू का गुलाम’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना गेल्या अनेक वर्षांपासून झगमगत्या विश्वापासून दूर आहे. तरी देखील ट्विंकल कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील ट्विंकल हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. एवढंच नाही ट्विंकल देखील स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. शिवाय ट्विंकल तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते.