Twinkle Khanna: प्रियांकाच्या कानाखाली मारण्यासाठी सेटवर पोहोचली होती ट्विंकल; त्यावेळी अक्षयने उचललं ‘हे’ पाऊल

'त्या' घटनेनंतर अक्षयने प्रियांका चोप्रापासून चार हात लांब राहणंच केलं पसंत; नेमकं काय घडलं?

Twinkle Khanna: प्रियांकाच्या कानाखाली मारण्यासाठी सेटवर पोहोचली होती ट्विंकल; त्यावेळी अक्षयने उचललं 'हे' पाऊल
Twinkle Khanna: प्रियांकाच्या कानाखाली मारण्यासाठी सेटवर पोहोचली होती ट्विंकल; त्यावेळी अक्षयने उचललं 'हे' पाऊल Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Dec 29, 2022 | 2:40 PM

मुंबई: अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा आज वाढदिवस आहे. ट्विंकल ही फिल्म इंडस्ट्रीतील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची मोठी मुलगी आहे. वाढदिवसानिमित्त पती अक्षय कुमारने ट्विंकलसाठी खास पोस्ट लिहित तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या दोघांनी 2001 मध्ये लग्नगाठ बांधली. अक्षय आणि ट्विंकलची जोडी ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. अनेकदा ही जोडी विविध कारणांमुळे चर्चेत आली. अक्षय, ट्विंकल आणि प्रियांका चोप्राचा एक किस्सा तर खूप चर्चेत होता. त्यावेळी या तिघांमध्ये नेमकं काय घडलं, ज्यानंतर अक्षयने प्रियांकासोबत काम करणं सोडून दिलं, ते जाणून घेऊयात..

अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राची जोडी ही त्यावेळी बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी होती. या दोघांनी अंदाज, ऐतराज आणि वक्त यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. 2003 मध्ये ‘अंदाज’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रियांका आणि अक्षय यांच्यातील जवळीक वाढल्याचं म्हटलं जातं.

हे सुद्धा वाचा

संपूर्ण इंडस्ट्रीत या दोघांच्या अफेअरची चर्चा पसरली होती. या चर्चांमुळे ट्विंकल खन्ना खूप अस्वस्थ झाली होती. ट्विंकलने अक्षयला प्रियांकापासून लांब राहण्यासही सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर तिने प्रियांकालाही फोन करून अक्षयपासून चार हात लांब राहण्याची ताकीद दिली होती, असं म्हटलं जातं. मात्र दोघांनाही इशारा देऊन काहीच फरक पडला नाही. अखेर ट्विंकलने असं पाऊल उचललं, ज्याची चर्चा आजही इंडस्ट्रीत होताना दिसते.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय आणि प्रियांकाच्या अफेअरच्या चर्चांमुळे अस्वस्थ झालेली ट्विंकल अखेर एके दिवशी शूटिंगच्या सेटवर पोहोचली होती. प्रियांकाला धडा शिकवण्यासाठी ट्विंकल तिला सेटवर शोधत होती. मात्र प्रियांका त्यादिवशी सेटवर गेली नव्हती. त्यावेळी अक्षय कुमारने ट्विंकलला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि तिला तिथून जाण्यास सांगितलं. या घटनेनंतर अक्षयने प्रियांकापासून चार हात लांब राहणंच पसंत केलं. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटानंतर या दोघांनी पुन्हा एकत्र कामच केलं नाही.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.