Twinkle Khanna करायची मासे विकायचं काम; खिलाडी कुमारच्या पत्नीचा मोठा खुलासा
अभिनेत्री होण्याआधी ट्विंकल खन्ना विकायची मासे.... लोक तिला म्हणायचे 'मच्छीवाली...', अभिनेता अक्षय कुमार यांच्या पत्नीचा पहिल्या नोकरीबाबत मोठा खुलासा
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) गेल्या अनेक वर्षांपासून झगमगत्या विश्वापासून दूर आहे. तरी देखील ट्विंकल कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील ट्विंकल हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. एवढंच नाही ट्विंकल देखील स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. शिवाय ट्विंकल तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. ट्विंकल कायम अनेक मुद्द्यांवर स्वतःचं मत मांडत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. आता ट्विंकल हिने तिच्या पहिल्या नोकरीबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र ट्विंकल खन्ना आणि तिच्या पहिल्या नोकरीच्या चर्चांनी जोर धरला आहे.
ट्विंकल खान्ना तिच्या पहिल्या नोकरीचा खुलासा करत म्हणाली, ‘एक काळ असा होता जेव्हा मी मासे आणि कोळंबीची डिलीव्हरी करायची…’. नुकताच ट्विंकल खन्ना आणि दिग्गज अभिनेते – कॉमेडियन जॉनी लिव्हर यांच्यासोबत ट्वीक इंडियावर नोकरीबाबत मोठा खुलासा केला आहे. ट्विंकल खन्ना म्हणाली, ‘तेव्हा मी एका मासे विकणाऱ्या कंपनीमध्ये काम करत होती…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मासे विकणारी कंपनी माझ्या आजीच्या बहिणीची होती. कंपनीचं नाव ‘मच्छीवाला’ असं होतं. ज्याठिकाणी मला मासे डिलिव्हर करण्याचं काम मिळालं होतं. आजही मला आठवत आहे. जेव्हा मी लोकांना माझ्या कामाबद्दल सांगायची तेव्हा ते मला मच्छीवाली आहेस का? असं विचारायचे…’ अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने तिच्या पहिल्या नोकरीबद्दल मोठा खुलासा केला आहे. (Twinkle Khanna first job)
ट्विंकल खन्ना हिने तिच्या पहिल्या नोकरीच्या अनुभवाबद्दल सांगितल्यानंतर जॉनी लिव्हर यांनी देखील स्वतःच्या नोकरीबद्दल सांगितलं. ‘मी देखील सुरुवातीच्या दिवसांत रस्त्यांवर पेन विकण्याचं काम करायचो. सोबतच सिनेमात मिमिक्री करण्याचं काम करायचो…’ दोघांनी त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितलं. सध्या सर्वत्र ट्विंकल आणि जॉनी लिव्हर यांच्या पहिल्या नोकरीच्या चर्चा रंगत आहेत.
ट्विंकल खन्ना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्रीने अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनयाचा निरोप घेतला. ट्विंकल खन्ना दिवंगत अभिनेते राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी आहे. ट्विंकल हिने ‘बरसात, मेला, जान, बादशाह, इंटरनॅशनल खिलाडी, जब प्यार किसी से होता है, इतिहास आणि जोरू का गुलाम’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.